ICC Champions Trophy 2025, Afghanistan vs England 8th Match : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आठव्या सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे दोन संघ मैदानात उतरले आहेत. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेला सामान दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी महत्त्वाचा आहे. सामना जिंकणारा संघ स्पर्धेतील पहिल्या विजयासह आपले खाते उघडून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. दुसरीकडे पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टॉस जिंकून अफगाणिस्तानच्या संघानं घेतली बॅटिंग; राशीद खानला मोठ्या विक्रमाची संधी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढतीत अफगाणिस्तानच्या संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ते इंग्लंडसमोर किती धावांचे आव्हान ठेवणार ते पाहण्याजोगे असेल. दुसरीकडे गोलंदाजीत अफगाणिस्तानचा स्टार राशीद खानला मोठा डाव साधण्याची संधी आहे. २ विकेट्स घेताच तो वनडेत २०० चा विकेट्सचा आकडा गाठेल. अशी कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा तो पहिला गोलंदाज ठरेल. हा डाव साधत संघाला तो विजय मिळवून देणारी कामगिरी करणार का त्यावरही सर्वांच्या नजरा असतील.
अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, मार्क वूड.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन रहमानुल्ला गुरबाझ (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी.