टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेदरम्यान नौटंकी करणाऱ्या पाकिस्तानसहबांगलादेशच्या आडमुठेपणावर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ICC पेक्षा कोणताही संघ मोठा नाही, अशा आशयाच्या शब्दांत जय शाह यांनी नाव न घेता पाकिस्तान आणि बांगलादेशला टोला लगावला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय मैदानात खेळलायला नकार दिला होता. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यावर आयसीसीने त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली होती. या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरकारच्या माध्यमातून भारविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा फसवा डाव खेळला होता. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यावर जय शाह यांनी या मुद्यावर मौन सोडले आहे.
"जा माहिकासारखं नशीब घेऊन ये..." हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडचा Attitude दाखवणारी पोस्ट चर्चेत
स्पर्धेचं भवितव्य धोक्यात होतं
मुंबईत आयोजित इंडियन बिझनेस लीडर अवॉर्ड्स कार्यक्रमात जय शाह यांनी काही संघांच्या सहभागाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे संपूर्ण स्पर्धेचं भवितव्य कसं धोक्यात आलं होतं, याचा खुलासा केला. आयसीसी प्रमुख म्हणून त्यांनी ठामपणे सांगितलं की, “कोणताही संघ संघटनेपेक्षा मोठा नसतो.”
पाकिस्तान-बांग्लादेशवर अप्रत्यक्ष निशाणा
कार्यक्रमादरम्यान बांग्लादेश किंवा पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता शाह म्हणाले, “यंदाची ICC वर्ल्ड कप स्पर्धा खूप महत्त्वाची होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही संघ सहभागी होणार की नाही, यावर मोठी चर्चा होती. आयसीसी अध्यक्ष म्हणून मी एवढंच सांगू शकतो की, कोणताही एक संघ संघटनेपेक्षा मोठा नसतो. सर्व संघ मिळूनच एक संघटना तयार होते.”
अमेरिका आणि नेपाळ संघाचे कौतुक
शाह यांनी सांगितलं की, या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला विक्रमी प्रेक्षकवर्ग लाभला. इतिहासात प्रथमच सुमारे७२ लाख प्रेक्षक एकत्रितपणे सामने पाहण्यासाठी उपस्थित होते. तसेच असोसिएट संघांच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं.अमेरिका राष्ट्रीय क्रिकेट संघ याने भारताला कडवी झुंज दिली, नेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघ याने पाकिस्तानला अडचणीत टाकलं, झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ याने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला, तर नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ याने इंग्लंडला दमवल्याचा उल्लेख यावेळी त्यांनी केला.
खास संदेश
शाह यांनी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी खास संदेश दिला. ते म्हणाले,
“टॉपवरून खाली यायला काहीच महिने लागतात, पण खालीून टॉपवर पोहोचायला अनेक वर्षे लागतात. मेहनत करत रहा आणि पुरस्कार जिंकत रहा.” बीसीसीआयमध्ये प्रशासकिय भूमिकेत असतानाच २०२८ ऑलिंपिकपर्यंतची योजना आखली होती, असेही ते म्हणाले.