ICC Bans Former Sri Lanka Cricketer : युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेची चर्चा रंगत असताना अबू धाबी T10 लीगमध्ये मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात ICC नं श्रीलंकन क्रिकेटरवर ५ वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या देशांतर्गत क्रिकेटमधील चेहरा असलेल्या सालिया समन हा एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या अँटी करप्सन कोडचं उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले असून या प्रकरणात दोषी आढळल्यावर या क्रिकेटवर आयसीसीने क्रिकेटच्या सर्व प्रकारात ५ वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०२१ मध्ये T10 मधील सामने फिक्स करण्याचा आखला होता डाव
श्रीलंकेचा ३९ वर्षीय समनशिवाय आठ जणांविरोधात सप्टेंबर २०२३ मध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. २०२१ मध्ये रंगलेल्या अबू धाबी T10 क्रिकेट लीगमधील सामने फिक्स करण्याचा डाव आखण्यात आला होता. हा प्रकार घडण्याआधीच आयसीसीने भष्टाचार विरोधी पथकाकरवी हा डाव उधळून लावला. त्यानंतर आता या प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रिकेटरला शिक्षा सुनावण्यात आलीये.
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
दोन वर्षांची शिक्षा भोगली, आणखी ३ वर्षे क्रिकेट खेळण्यावर बंदी
हे प्रकरण समोर आल्यावर श्रीलंकन क्रिकेटर सालिया समन याला १३ सप्टेंबर २०२३ मध्ये निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात दोषी आढळल्यावर मागील दोन वर्षांपासून क्रिकेटरपासून दूर असलेल्या या क्रिकेटरला आणखी तीन वर्षे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होता येणार नाही. समन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये १०१ प्रथम श्रेणी सामन्यांसह ७७ लिस्ट ए सामने खेळले आहेत.
करिअर संपल्यात जमा
सालिया समन याच्यावर ECB अचारसंहितेतील कलम २.१.१, २.१.३ आणि २.१.४ नुसार, मॅच फिक्सिंग, मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न करणे आणि मॅच फिक्सिंगसाठी उसकावणे असे आरोप करण्यात आले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील या क्रिकेटरनं १०१ प्रथम श्रणी सामन्यात २७.९५ च्या सरासरीसह २ शतक आणि २२ अर्धशतकांसह ३६६२ धावा केल्या आहेत. १२९ ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. ७७ लिस्ट ए सामन्यात त्याच्या खात्यात ८९८ धावा जमा आहेत. पाच वर्षांच्या बंदीच्या कारवाईमुळे त्याचे करिअरच संपल्यात जमा आहे.
Web Title: ICC Bans Former Sri Lanka First Class Cricketer Saliya Saman For Corruption T10 League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.