Join us

तिसऱ्या सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्यामुळे 'या' खेळाडूवर आयसीसीने घातली बंदी

नागपूर येथे झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 15:50 IST

Open in App

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नुकतीच ट्वेन्टी-२० मालिका झाली. या मालिकेत भारताने बांगलादेशवर २-१ असा विजय मिळवला होता. नागपूर येथे झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली होती. तिसऱ्या सामन्यात चेंडूशी छेडछाड झाल्याची गोष्ट घडल्याचे दिसले होते. ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हाचा व्हिडीओही वायरल झाला होता. त्यामुळे आता आयसीसीने या खेळाडूवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

 

एकिकडे हा सामना सुरु असताना अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तिसरा एकदिवसीय सामना सुरु होता. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरनने चेंडूशी छेडछाड केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता पुरनवर आयीसीने कडक कारवाई केल्याचे पाहायला मिळाले आहे.

पुरनने अवैधरीत्या चेंडूचा आकार बदलला, असा आरोप आयसीसीने केला असून याबाबत त्याच्यावर कडक कारवाई केली आहे. आयसीसीने पुरनवर आता चार सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यापुढील चार सामन्यांमध्ये पुरनला खेळता येणार नाही.

टॅग्स :आयसीसी