भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला हरवून २०२५ चा आशिया कप जिंकला. मात्र, अजूनही विजयी ट्रॉफी अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडाळाला परत मिळालेली नाही. बीसीसीआयने आशा व्यक्त केली आहे की, आशिया कप ट्रॉफी एक-दोन दिवसांत मुंबईतील मुख्यालयात पोहोचेल, अन्यथा ते ४ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया याबाबत नाराजी व्यक्त केली. "आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत, १० दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पत्र लिहिले, पण त्यांची भूमिका अद्याप बदललेली नाही. ट्रॉफी अजूनही त्यांच्या ताब्यात आहे. ही ट्रॉफी एक-दोन दिवसांत मुंबईतील मुख्यालयात पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर, ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करू."
आशिया कप विजयानंतर, भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वीने ट्रॉफी भारताला खेळाडूंना ट्रॉफी घेण्याचा आग्रह धरला, परंतु भारतीय खेळाडूंनी ते स्वीकारले नाही. त्यामुळे नक्वी संतापले आणि त्यांनी ट्रॉफी सोबत मैदान सोडले. त्यानंतर वृत्त समोर आले की, त्यांनी ट्रॉफी एसीसीच्या एका बंद खोलीत ट्रॉफी ठेवली आहे.