MS Dhoni ICC Hall of Fame : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मोठा सन्मान केल आहे. आता आयसीसीने त्याच्या नावाचा समावेश हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा खास सन्मान मिळालेला धोनी हा भारताचा १० वा खेळाडू आहे. धोनीसह यावर्षी आयसीसीनं हाशिम आमला आणि मॅथ्यू हेडन यांचाही या खास यादीत समावेश केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनी म्हणाला, हा माझ्यासाठी हा अभिमानास्पद क्षण
शांत स्वभावासह क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम रणनितीकार अशी धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तत्कालीन सर्व आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. ५३८ सामन्यात त्याने १७ हजार २६६ धावांसह विकेटमागे ८२९ फलंदाजांची शिकार करत क्रिकेट जगतात खास छाप सोडली आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली आहे.