Rohit Sharma Revealed That He Made His Retirement Plan 2023 World Cup 2025 Final : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा २०२७ च्या वनडे वर्ल्ड खेळण्याचं स्वप्न बाळगून आहे. टी-२० पाठोपाठ कसोटीतील निवृत्ती घेतल्यावर अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने वनडेत सक्रीय राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण तुम्हाला माहितीये का? घरच्या मैदानातील वनडे वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमधील पराभवानंतरच तो आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात होता. खुद्द रोहित शर्मानं एका कार्यक्रमात यासंदर्भातील गोष्ट बोलून दाखवली आहे. इथं जाणून घेऊयात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर संघातील खेळाडूंसह रोहित शर्मा कोणत्या अवस्थेत होता? त्यातून तो कसा सारवला? यासंदर्भात खुद्द हिटमॅननं शेअर केलेली मनातली गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
“मी त्या वर्ल्ड कपमध्ये माझं सर्वस्व पणाला लावलं होतं”
एका कार्यक्रमादरम्यान रोहित शर्माने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमधील पराभव हा मोठा धक्का होता असे म्हटले आहे. तो म्हणाला की,
त्या पराभवानंतर आम्ही सगळेच खूप दुःखी होतो. फायनल हरलो आहोत यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता, कारण मी त्या वर्ल्ड कपसाठी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं. केवळ दोन-तीन महिने आधीपासूनच नाही, तर २०२२ मध्ये जेव्हा मी कर्णधारपद स्वीकारलं, तेव्हापासूनच मी या वर्ल्ड कपबद्दल विचार करत होतो.
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
मनात घोळत होता निवृत्तीचा विचार, पण...
तो पुढे म्हणाला,
अहमदाबादमध्ये झालेल्या पराभवानंतर मला प्रामाणिकपणे असं वाटलं की, आता मला क्रिकेट खेळायचंच नाही. वर्ल्ड कपसाठी मी माझं सर्व काही झोकून दिलं होतं. जेव्हा आम्ही हरलो, तेव्हा मला असं जाणवलं की, माझ्या शरीरात आणि मनात काहीच उरलेलं नाही. या पराभवानं माझी सगळी ऊर्जा शोषून घेतली होती. या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी मला अनेक महिने लागले.
पराभवाच्या दुःखातून रोहित शर्मा कसा सावरला?
मला वाटतं, ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंतता आणि अपेक्षित निकाल मिळत नाही, त्यावेळी असं होणं स्वाभाविक आहे. त्या पराभवानंतर माझ्यासोबतही तेच घडलं. पण मला हेही ठाऊक होतं की, इथेच आयुष्य संपत नाही. हा माझ्यासाठी मोठा धडा होता.या परिस्थितीतून कसं बाहेर यायचं? स्वतःला कसं रीसेट करायचं? याचा कॅलक्युलेटिव्ह विचार केला. मग मी २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपवर लक्षकेंद्रीत केले. आज हे सगळं सांगणं खूप सोपं आहे, पण तो काळ माझ्यासाठी सर्वात कठीण होता.” असे रोहित शर्मा म्हणाला आहे.
Web Summary : Rohit Sharma revealed he considered retirement after the 2023 World Cup final loss. He felt drained after giving everything. Focused on resetting, he then targeted the 2024 T20 World Cup. The loss was a tough lesson.
Web Summary : रोहित शर्मा ने खुलासा किया कि 2023 विश्व कप फाइनल में हार के बाद उन्होंने संन्यास लेने पर विचार किया। सब कुछ देने के बाद वह थक गए थे। फिर 2024 टी20 विश्व कप पर ध्यान केंद्रित किया। हार एक कठिन सबक थी।