लखनौ - वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नव्या चेंडूने गोलंदाजी करणाºया खलील जबाबदारी घ्यायला आवडते, त्याचबरोबर दबावाखाली त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम होत नाही,असेही त्याने स्पष्ट केले.
या सामन्यात खलीलने सुरुवातीलाच वेस्ट इंडिजला दोन धक्के दिले होते. त्याने शाइ होप व शिमरॉन हेटमेअर यांना स्वस्तात बाद करत विंडिजवर दबाव आणला. तो म्हणाला, ‘नवीन चेंडूने गोलंदाजी करत असल्यामुळे माझ्यावर जास्त जबाबदारी होती. मला नेहमीच जबाबदारी घ्यायला आवडते. लहाणपणापासून भारताकडून खेळायचे माझे स्वप्न होते. आता जर मी दबाव घेतला तर मी माझ्या क्षमतेनुसार खेळू शकणार नाही.’
खलील म्हणाला, ‘भारताकडून चांगली कामगिरी करणे हे माझे लक्ष्य आहे. जर तुम्ही खेळाचा आनंद घेत असाल तर चांगली कामगिरी करण्याची तुमची भूक वाढतच जाते.’ तो म्हणाला, ‘आयपीएलमध्ये खेळण्याचा चांगलाच फायदा होता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शैलीत बदल करावा लागत नाही.’ (वृत्तसंस्था)