Join us

धोनीची परिस्थिती मी समजू शकतो, संघातून डच्चू दिल्यावर बोलला सचिन तेंडुलकर

धोनीसारखी परिस्थिती माझ्यावरही आली होती, असेही सचिनने यावेळी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 16:24 IST

Open in App
ठळक मुद्देआता तर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही धोनीला पाठिंबा दिला आहे.

नवी दिल्ली :  वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघातून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले. त्यामुळे धोनीचे चाहते चांगलेच वैतागले होते, आता तर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही धोनीला पाठिंबा दिला आहे. धोनीसारखी परिस्थिती माझ्यावरही आली होती, असेही सचिनने यावेळी म्हटले आहे.

याबाबत सचिन म्हणाला की, " धोनीला वगळण्यामागे निवड समितीची काय नेमकी मानसीकता आहे, हे मला माहिती नाही. त्याचबरोबर ड्रेसिंगरुममध्येही काय वातावरण आहे, हे मला माहिती नाही. पण धोनी हा क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामध्ये चपखल बसणारा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला धोनीवर जी परिस्थिती आली आहे, ती माझ्यावरही आली होती. त्यावेळी मला जे काही करायचे होते ते केले. या परिस्थितीत धोनीला काय करायला हवे, हेदेखील त्याला चांगलेच माहिती असेल."

टॅग्स :सचिन तेंडुलकरमहेंद्रसिंह धोनीटी-20 क्रिकेट