रिषभ पंत लखनऊ सुपर जाएंट्सचा (LSG) नवा कर्णधार झाला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सचे मालिक संजीव गोएंका यांनी सोमवारी पंत आपल्या मालकीच्या संघाचा कॅप्टन असेल, ही घोषणा केली. स्टार विकेटकीपर-बॅटर हा आयपीएल इतिहासातील महागड्या खेळाडूनंतर आता महागडा कॅप्टनही झाला आहे. कॅप्टन झाल्यावर LSG चे संघ मालक संजीव गोएंका यांच्यासमोरच पंत लिलावावेळी मनात निर्माण झालेली भीती अन् प्रितीच्या संघाच टेन्शन यावर भाष्य केले. त्याचं हे वक्तव्य पंजाबची मजाक उडवणारे आहे. पण प्रितीच्या संघाने खास रिप्लाय देत गोडी गुलाबीत पंतला रिप्लाय दिल्याचा सीन पाहायला मिळाला. जाणून घेऊयात यासंदर्भातील खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतवर असेल प्रीतीचा डोळा.. अशी चर्चाही रंगलेली; विकेट किपर बॅटरला आलं होतं टेन्शन!
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रिषभ पंतला रिलीज केल्यावर मेगा लिलावात प्रीती झिंटाच्या मालकीचा पंजाब किंग्स संघ या स्टार विकेट किपर बटरवर तगडी बोली लावेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दिल्लीच्या ताफ्यातून रिकी पाँटिंग पंजाबच्या संघात जॉईन झाल्यामुळे पंत प्रीतीच्या संघातून खेळेल, अशी चर्चा रंगली होती. रिषभ पंतच्या मनातही तेच सुरु होते. पंजाबच्या पर्समध्ये मोठी रक्कम होती, ते मला खरेदी करतील, याचं मला टेन्शन आलं होते, असे पंत LSG चा कॅप्टन झाल्यावर म्हणाला. आता प्रीतीच्या संघात जाण्याची त्याला का भीती होती, हे त्याने सांगितले नाही. पण त्याचे हे वक्तव्य पंजाब किंग्सची थट्टा केल्यासारखं आहे. पण प्रीतीच्या संघानं ते फारसं मनावर घेतल्याचे दिसत नाही.
काय म्हणाला पंत?
रिषभ पंत आणि LSG संघाचे मालक संजीव गोएंका स्टार स्पोर्ट्सच्या खास शोमध्ये गप्पा गोष्टी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या रिषभ पंत याने लिलावासंदर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे. पंत म्हणाला की, मला फक्त एका गोष्टीचं टेन्शन होतं ते म्हणजे पंजाब. त्यांच्या पर्समध्ये सर्वाधिक ११२ कोटी रुपये होते. पंजाबच्या संघानं श्रेयस अय्यरसाठी २६.७५ कोटी मोजल्यावर मी टेन्शन फ्री झालो. लखनऊमध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला, अशा आशयाच्या वक्तव्य पंतनं केलं आहे.
प्रीतीच्या पंजाब संघाकडून असा आला रिप्लाय
पंजाब किंग्सच्या संघानं पंतची कमेंट फारशी मनावर न घेता मनाचा मोठेपणा दाखवणारं ट्विट केलं आहे. बेधडक युवा धमाका करण्यासाठी तयार, अशी शब्दांत प्रीतीच्या मालकीच्या पंजाब संघाने पंतला कॅप्टन्सीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Title: I Had Only One Tension That Was Punjab Rishabh Pant Big Revelation About IPL 2025 Auction Preity Zinta Owner IPL Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.