Rohit Sharma Mumbai Indians : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आता Kieron Pollardकडे सोपवावे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सल्ला 

IPL 2022, MI vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला १५व्या पर्वात सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:07 IST2022-04-13T14:06:23+5:302022-04-13T14:07:31+5:30

whatsapp join usJoin us
I felt Rohit Sharma might leave Captaincy and hand the responsibility to Kieron Pollard, like Virat Kohli." - Sanjay Manjrekar  | Rohit Sharma Mumbai Indians : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आता Kieron Pollardकडे सोपवावे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सल्ला 

Rohit Sharma Mumbai Indians : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आता Kieron Pollardकडे सोपवावे; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सल्ला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, MI vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला १५व्या पर्वात सलग चार पराभव पत्करावे लागले आहेत. ते आता गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत आणि आज त्यांचा मुकाबला पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे. मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील PBKS संघ ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. आता विराट कोहलीप्रमाणे रोहित शर्मानेही ( Rohit Sharma) कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं आणि मुंबई इंडियन्सचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे सोपवावं, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांनी दिला आहे.  

ESPNcricinfo ला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर यांनी हे विधान केले. पोलार्डला चार सामन्यांत ४७ धावा करता आल्या आहेत, तरीही तो मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतो आणि त्याचा कर्णधार म्हणून विचार करायला हवा, असे मत मांजरेकर यांनी व्यक्त केले. रोहितच्या नावावर पाच जेतेपदं आहेत आणि मुंबई इंडियन्स सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. मुंबई इंडियन्सकडे सक्षम खेळाडू नसल्यामुळे त्यांना हार मानावी लागली आहे. 

मांजरेकर म्हणाले, पोलार्ड अजूनही संघासाठी अमुल्य योगदान देऊ शकतो. रोहित शर्माने विराटच्या पावलावर पाऊल ठेऊन कर्णधारपद सोडावे असे मला वाटते. त्यामुळे तो रिलॅक्स होऊन फक्त फलंदाज म्हणून दमदार कामगिरी करू शकतो. त्याने ही जबाबदारी पोलार्डकडे सोपवायला हवी. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे.  

Web Title: I felt Rohit Sharma might leave Captaincy and hand the responsibility to Kieron Pollard, like Virat Kohli." - Sanjay Manjrekar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.