Join us  

'मी त्याला फक्त व्हिडीओ कॉलवर पाहतोय'; मुलाच्या सुरक्षिततेसाठी वॉशिंग्टन सुंदरचे वडील राहतायेत दुसऱ्या घरात

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तीन-साडेतीन महिन्यांच्या या दौऱ्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय व यजमान क्रिकेट बोर्ड सर्व खबरदारी घेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 4:02 PM

Open in App

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तीन-साडेतीन महिन्यांच्या या दौऱ्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय व यजमान क्रिकेट बोर्ड सर्व खबरदारी घेत आहेत. बीसीसीआयनं इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या सर्व खेळाडूंना मुंबईत येण्यास सांगितले आणि तेथे त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. तेथून थेट लंडनमध्ये पोहोचल्यावर खेळाडूंना पुन्हा क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. पण, तत्पूर्वी मुंबईत खेळाडूंची कोरोना चाचणी होईल आणि त्यात एखाद्या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचा लंडन दौरा रद्द केला जाईल, असे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येक जण काळजी घेत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याचे वडील स्वतः दुसऱ्या घरी शिफ्ट झाले आहेत. भारतीय संघाला सरकारकडून मोठा दिलासा; जागतिक कसोटी फायनलसाठी मिळाली ताकद!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वॉशिंग्टननं मिळालेल्या संधीचं सोनं केलं होतं. त्यामुळेच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे. भारतीय संघ येथे 18-23 जून या कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या जेतेपदाचा सामना खेळेल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी फक्त वॉशिंग्टनच नव्हे, तर त्याचे वडिलही उत्सुक आहेत. आपल्या मुलाला कोरोनापासून बचाव करण्यासाठी ते स्वतः दुसऱ्या घरात शिफ्ट झाले आहेत. New Indian Express शी बोलताना वॉशिंग्टनंच्या वडिलांनी यामागचं कारण सांगितले. भारताच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोरोनामुळे गमावले आईचे छत्र

कामानिमित्तानं ते रोज घराबाहेर पडतात आणि त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्यांनी वॉशिंग्टनपासून दूर वेगळ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले,''वॉशिंग्टन आयपीएलमधून घरी परतल्यानंतर मी दुसऱ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. माझी पत्नी व मुलगी वॉशिंग्टनसह घरीच असतात. ते घराबाहेर जात नाहीत. मी व्हिडीओ कॉलवरच त्याच्याशी बोलतोय, त्याला पाहतोय. मला आठवड्यातून काही दिवस कामावार जावे लागते. माझ्यामुळे वॉशिंग्टनला कोरोनाची लागण होऊ नये, ही माझी इच्छा आहे.''महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघातील खेळाडूवर संकट; सामन्यानंतर मिळाली त्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी

''लॉर्ड्सवर खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि इंग्लंडमध्येही त्याला खेळायचे आहेच. त्याचे हे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला ही संधी गमावायची नाही,''असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धावॉशिंग्टन सुंदरभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध न्यूझीलंडकोरोना वायरस बातम्या