India tour of England: भारतीय संघाला सरकारकडून मोठा दिलासा; जागतिक कसोटी फायनलसाठी मिळाली ताकद!

India tour of England: भारतीय संघ पुढील महिन्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:11 PM2021-05-18T14:11:48+5:302021-05-18T14:12:14+5:30

whatsapp join usJoin us
India tour of England: Relief for Virat Kohli and team, UK government relaxes quarantine norms for Indian cricketers | India tour of England: भारतीय संघाला सरकारकडून मोठा दिलासा; जागतिक कसोटी फायनलसाठी मिळाली ताकद!

India tour of England: भारतीय संघाला सरकारकडून मोठा दिलासा; जागतिक कसोटी फायनलसाठी मिळाली ताकद!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India tour of England: भारतीय संघ पुढील महिन्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडणार आहे. त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंची घरोघरी जाऊन RT-PCR टेस्ट करायला सुरूवात केली असून १९ मे ला सर्व खेळाडूंना मुंबईत हजर राहण्यास सांगितले आहे. या दौऱ्यावर भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांनाही घेऊन जाता येणार आहे. दरम्यान या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाला लंडन सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भारताच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोरोनामुळे गमावले आईचे छत्र

लंडन सरकारनं विराट कोहली अँड टीमच्या क्वारंटाईन नियमांत व  प्रवासबंदीचे काही नियम शिथिल केले आहेत. तीन महिन्यांचा हा दौरा असणार आहे. लंडन सरकारनं कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भारताला रेड यादीत टाकले आहे. नियमानुसार भारतातून येणाऱ्या लंडन किंवा आयर्लंड नागरिकांनाच लंडनमध्ये प्रवेश देण्यात येईल.
२ जूनला टीम इंडिया लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ३ जूनला भारतीय खेळाडू लंडनमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर साऊदॅम्प्टन हॉटेलमध्ये त्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल. १८ जूनला भारत-न्यूझीलंड यांच्यात फायनल होईल. लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत २४ मेपासून क्वारंटाईनमध्ये राहतील.  बीसीसीआयनं खेळाडूंसाठी हैदराबाद, दिल्ली व चेन्नई येथून चार्टर्ड फ्लाईटची सोय केली आहे. बंगळुरूत असलेल्या खेळाडूंना गाडीनं चेन्नईत येण्यास सांगितले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघातील खेळाडूवर संकट; सामन्यानंतर मिळाली त्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी

वृद्धीमान सहा व मोहम्मद शमी हे कोलकाता येथे आहेत आणि ते व्यावसायिक विमानानं मुंबईत दाखल होतील. गुजरात येथील खेळाडूंनाही तसाच प्रवास करावा लागेल. मुंबईतील क्वारंटाईन कालावधीत खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाईल आणि त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या खेळाडूला लंडन दौऱ्याला मुकावे लागेल.   

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव;

लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर;

राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला. ( Team India WTC Plan : दोन टप्प्यांत १८ दिवसांचे क्वारंटाईन, खेळाडूंसह कुटुंबीयांनाही प्रवासाला परवानगी) 

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

१८ ते २३ जून - भारत विरुद्ध न्यूझीलंड ( जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल)
 

भारत वि. इंग्लंड कसोटी मालिका

४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी
१२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी
२५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी
२ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी
१० ते १४ सप्टेंबर - पाचवी कसोटी
 

Web Title: India tour of England: Relief for Virat Kohli and team, UK government relaxes quarantine norms for Indian cricketers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.