Join us

"मी भारतीय आहे आणि मला तुझी पत्नी आवडते"; फॅन्सच्या कमेंटवर पॅट कमिन्सचं भन्नाट उत्तर 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि चाहता याच्यातला इंस्टाग्रामवर रंगलेला संवाद चांगलाच चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:00 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि चाहता याच्यातला इंस्टाग्रामवर रंगलेला संवाद चांगलाच चर्चेत आला आहे. मागील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-१ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर कमिन्स सुट्टीवर आहे आणि तो कुटुंबासोबत एन्जॉय करतोय... त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या जर्सीत लवकरच पुन्हा दिसेल आणि त्यानंतर आयपीएलसाठी दोन महिन्यांसाठी भारतात येईल. आयपीएलनंतर जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी अमेरिका व वेस्ट इंडिजसाठी रवाना होईल पुढील काही महिने सतत क्रिकेट असल्याने कमिन्स सध्या कुटुंबियांसोबत विश्रांती एन्जॉय करतोय.

त्याने पत्नी बेकी बॉस्टनसोबतचा फोटो आज व्हॅलेन्टाईन दिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट केला. नवरा-बायको सर्फींग करून बाहेर आले होते आणि कमिन्सने तो फोटो पोस्ट केला व लिहिले की, सुपर मॉम, पत्नी, माझी व्हॅलेंटाईन आणि प्रो सर्फरही... हॅप्पी व्हॅलेंटाईन...

कमिन्सने पोस्ट केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आणि चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रेम व्यक्त केलं. पण, फरहान खान नामक एका चाहत्याची कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे. त्याने लिहिले की, मी भारतीय आहे आणि मला तुझी पत्नी आवडते..

त्यावर कमिन्सनेही भन्नाट उत्तर दिले. मी तुझा मॅसेज माझ्या पत्नीला देतो...  

टॅग्स :ऑफ द फिल्डआॅस्ट्रेलियासोशल व्हायरल