Join us

शतकाविना शंभर लढती; विराटच्या नावे नकोसा विक्रम...

आयपीएलमध्ये यंदा ७ सामन्यांत त्याच्या केवळ ११९ धावा झाल्या. ४८ ही सर्वोच्च खेळी ठरली. आयपीएलच्या २१४ सामन्यांत सर्वाधिक ६४०२ धावा ठोकण्याचा मानदेखील विराटलाच आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:27 IST

Open in App

टीम इंडिया आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदला गेला. गेल्या शंभर सामन्यांत त्याने शतक ठोकलेले नाही. विराटने १७ कसोटी, २१ वन डे, २५ टी-२० आणि ३७ आयपीएल सामन्यांत शतकी खेळी केलेली नाही.-  विराटने अखेरचे वन डे शतक १४ ऑगस्ट २०१९ ला क्वीन्स पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध, तर कसोटी शतक २२ नोव्हेंबर २०१९ ला ईडन गार्डनवर बांगला देशविरुद्ध साजरे केले.-  आयपीएलमध्ये यंदा ७ सामन्यांत त्याच्या केवळ ११९ धावा झाल्या. ४८ ही सर्वोच्च खेळी ठरली. आयपीएलच्या २१४ सामन्यांत सर्वाधिक ६४०२ धावा ठोकण्याचा मानदेखील विराटलाच आहे. 

-  आंतरराष्ट्रीय सामन्यात २३,६५० धावांसह सर्वाधिक धावा काढण्यात विराट ७ व्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकर ३४,३५७ धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे.

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२२भारतीय क्रिकेट संघ
Open in App