Join us

आज होतोय कोट्यवधींचा पाऊस, पण कपिल देव यांच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन

क्रिकेटमध्ये आजच्या घडीला बरेच बदल पाहायला मिळत आहेत... काळ उलटला अन् क्रिकेटमध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान आले, जर्सीचा रंग बदलला, नियम बदलले आणि खेळण्याची शैलीही बदलली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 10:32 IST

Open in App

मुंबई : क्रिकेटमध्ये आजच्या घडीला बरेच बदल पाहायला मिळत आहेत... काळ उलटला अन् क्रिकेटमध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान आले, जर्सीचा रंग बदलला, नियम बदलले आणि खेळण्याची शैलीही बदलली. त्यासह खेळाडूंच्या मानधनातही घसघशीत वाढही झाली. पण, तुम्हाला माहित आहे का की 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या खेळाडूंना दिवसाला किती मानधन मिळायचे? सध्या कपिल देव यांच्या टीमच्या मानधनाची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आताच्या घडीला क्रिकेटपटून लाखो-कोटीच्या घरात मानधन घेतात, परंतु 20-25 वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. कपिल देव आणि सुनील गावस्कर या दिग्गज खेळाडूंना फार कमी पैसे मिळायचे. 1983मध्ये जेव्हा भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावला होता, तेव्हा मिळालेली बक्षीस रक्कम ही तुटपूंजी होती.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत भारतीय संघातील खेळाडूंना मिळणारे मानधन लिहिले आहे. 21 सप्टेंबर 1983च्या वन डे मालिकेतील हा फोटो आहे. त्यावेळी बिशन सिंग बेदी हे मॅनेजर होते.  या यादीनुसार मॅनेजरसह सर्व खेळाडूंना 1500 रुपये मॅच फी मिळत होती. यात 200 रुपये प्रतिदीन असा भत्ता दिला जात असल्याची नोंद आहे. यानुसार खेळाडूंना एकूण 2100 रुपये दिले जात होते. आजच्या घडीचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. स्थानिक क्रिकेटमध्ये चार दिवसांच्या सामन्यासाठी खेळाडूंना प्रतिदीन 35000 रुपये दिले जातात. 

टॅग्स :कपिल देवविराट कोहली