IPL 2022 Mega Auction : Ishan Kishan साठी मुंबई इंडियन्स Vs RCB असा सामना रंगणार; २०१८चा किस्सा पुन्हा घडणार!, Video

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे आणि यावेळेस इशान किशन, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर आदी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:48 AM2022-02-04T10:48:04+5:302022-02-04T10:49:14+5:30

whatsapp join usJoin us
How MI defeated CSK and RCB to sign Ishan Kishan for INR 6.20 crore at IPL auction 2018, Watch Video | IPL 2022 Mega Auction : Ishan Kishan साठी मुंबई इंडियन्स Vs RCB असा सामना रंगणार; २०१८चा किस्सा पुन्हा घडणार!, Video

IPL 2022 Mega Auction : Ishan Kishan साठी मुंबई इंडियन्स Vs RCB असा सामना रंगणार; २०१८चा किस्सा पुन्हा घडणार!, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे आणि यावेळेस इशान किशन, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर आदी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची संधी आहे. इशान किशन याच्याकडे भविष्याचा कर्णधार म्हणून अनेक फ्रँचायझी पाहत आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर गुंतवणूक करण्यासाठी फ्रँचायझी प्रयत्नशील असणार आहेत. काहींच्या मते इशान किशन ( Ishan Kishan) यावेळी २० कोटींचा टप्पा ओलांडून इतिहास घडवण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) नव्या कर्णधाराच्या शोधात आहे आणि इशान किशन त्या शर्यतीत असू शकतो. पण, मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) त्यांच्या माजी खेळाडूला असं सहजासहजी जाऊ देणार नाही. त्यामुळे २०१८प्रमाणे यंदाच्या लिलावात MI vs RCB असा सामना पुन्हा पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

गुजरात लायन्सकडून खेळताना आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या इशान किशनसाठी २०१८च्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्स ( CSK), RCB आणि MI यांच्यात चढाओढ रंगली होती. ४० लाखांपासून इशान किशनसाठी बोली सुरू झाली आणि २.८० कोटीपर्यंत CSK व MI या दोन फ्रँचायझी शर्यतीत होत्या. त्यानंतर चेन्नईने माघार घेतली आणि मुंबईने जवळपास ३ कोटींत इशानला ताफ्यात दाखल करून घेतलेच होते. पण, तितक्यात RCBने एन्ट्री मारली आणि इशानवरील बोली ३.२० कोटीपर्यंत गेली. या दोघांनी ६ कोटींपर्यंत इशानवर बोली लावली आणि त्यानंतर RCBलाही माघार घ्यावी लागली.  मुंबई इंडियन्सने ६.२० कोटींत इशानला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. 

पाहा व्हिडीओ...

इशानने २०१८च्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून १२ सामन्यांत २७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१९च्या पर्वात त्याला ७ सामने खेळण्याची संधी दिली आणि त्यात त्याने १०१ धावा केल्या. २०२० मध्ये २३ वर्षीय खेळाडूची बॅट चांगलीच तळपली. १४ सामन्यांत त्याने ५१६ धावा केल्या. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातही त्याला संधी मिळाली. 

Web Title: How MI defeated CSK and RCB to sign Ishan Kishan for INR 6.20 crore at IPL auction 2018, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.