Join us

कसं काय भावा? अरे, मला कुत्रा चावला; मैदानात उतरताच अर्जुन तेंडुलकरनं दाखवली जखम

लखनौ सुपरजायंट्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोमवारी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 10:00 IST

Open in App

लखनौ - मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरलाकुत्रा चावला आहे. विशेष म्हणजे स्वत: अर्जुननेच याबाबत माहिती दिली. लखनौ येथे ही घटना घडली आहे. लखनौ सुपरजायंट्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, अर्जुन स्वत:च, माझ्या हाताच्या बोटाला कुत्रा चावल्याचं सांगत आहे. मात्र, नेमका कोणत्या प्रकारचा कुत्रा चावला हे त्याने सांगितलं नाही. 

लखनौ सुपरजायंट्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोमवारी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लखनौतील अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये आपल्या सहकारी खेळाडूंना जादू की झप्पी देताना अर्जुन दिसून येतो. त्यामध्ये, सहकारी खेळाडू मित्राने विचारले की, भावा कसं काय भावा, बोटाला काय झालं? अरे मला कुत्रा चावला, असे अर्जुनने म्हटल्याचे व्हिडिओत ऐकू येते. दरम्यान, अर्जुनला झालेली ही दुखापत गंभीर नसून किरकोळ असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. 

लखनौ सुपरजायंटसचा संघ येथील ताज हॉटेलमध्ये थांबला असून रविवारी त्यांनी येथील अलटबिहारी वाजपेयी स्टेडियमवर सराव केला. तर, मुंबई इंडियन्सची टीमही तिथेच आहे, त्यामुळे हॉटेलमध्येच अर्जुनला कुत्रा चावला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ट्विटरवरील या व्हिडिओवरुन युजर्स  अनेक प्रश्न विचारत आहेत. कुत्रा नेमका कुठे चावला, कोणत्या प्रजातीचा होता, असेही प्रश्न युजर्सं विचारत आहेत.  

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२३कुत्रा
Open in App