ऐतिहासिक सामन्यापूर्वी कशी झाली भारतीय संघाची ओळख परेड, पाहा खास व्हिडीओ

यावेळी बांलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी भारताच्या खेळाडूंची खास भेटली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 13:15 IST2019-11-22T13:15:00+5:302019-11-22T13:15:19+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
How the Indian team was introduced before the historic match, see the special video | ऐतिहासिक सामन्यापूर्वी कशी झाली भारतीय संघाची ओळख परेड, पाहा खास व्हिडीओ

ऐतिहासिक सामन्यापूर्वी कशी झाली भारतीय संघाची ओळख परेड, पाहा खास व्हिडीओ

कोलकाता : ऐतिहासिक कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाची खास ओळख परेड झाली. यावेळी बांलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी भारताच्या खेळाडूंची खास भेटली.

 

बांगलादेशच्या पंतप्रधान सामना सुरु होण्यापूर्वीच मैदानात दाखल झाला. यावेळी त्यांना भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघाची ओळक करून दिली. यावेळी ममता बॅनर्जी यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीही उपस्थित होते. यावेळी हसिना यांनी कोहली आणि संघाबरोबर आपले फोटोही काढले.

ऐतिहासिक सामन्याबद्दल काय सांगतायत रवी शास्त्री, पाहा व्हिडीओ
कोलकाता : भारत आणि बांगलादेश यांच्यामधील पहिल्या डे नाइट सामन्याला काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्याबद्दल भारतीय खेळाडूंच्या मनात नेमके आहे तरी काय, हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.

रवी शास्त्री म्हणाले की, " हा भारतीय संघासाठी ऐतिहासिक क्षण आहे. कारण यापूर्वी भारतीय संघ असा सामना कधीच खेळलेला नाही. त्यामुळे भारतीय संघामध्ये या सामन्याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या ऐतिहासिक सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे." 

Web Title: How the Indian team was introduced before the historic match, see the special video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.