Arjun Tendulkar Engagement Saaniya Chandhok meeting : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा बुधवारी साखरपुडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनचा साखरपुडा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी हिच्यासोबत झाला. मुंबईमध्ये अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाला. या समारंभात दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र उपस्थित होते. मोजक्या निमंत्रितांमध्ये हा साखरपुडा पार पडला. अर्जुन आणि सानिया यांचा प्रेमविवाह असणार आहे. ते पहिल्यांदा कुठे भेटले, त्या दोघांना पहिले कुणी भेटवलं? जाणून घ्या.
सानिया चांडोकचा मुंबईत खास व्यवसाय
सानिया चांडोकचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योजकांचे कुटुंब आहे. रवी घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत. ती अब्जाधीशांच्या कुटुंबातील असली तरीही ती स्वत:देखील उद्योजिका असून मुंबईत तिचा स्वत:चा एक खास पद्धतीचा व्यवसाय आहे. सानिया चांडोक मुंबईमध्ये प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर चालवते. 'मिस्टर पॉज'ची असे त्याचे नाव असून ती त्याची संस्थापक आहे. सानिया स्वत: वेटेरनरी टेक्निशिअन आहे. पाळीव प्राण्यांबद्दल तिला प्रेम आहे. ती प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी अनेक मोहिमांमध्ये सहभागी झालेली आहे.
सानिया चांडोक आणि अर्जुन यांची भेट कशी झाली?
सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकर एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत होते. दोघांची कुटुंबेही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकरची बहिण सारा तेंडुलकर यांच्या घट्ट मैत्री आहे. त्यामुळेच सानिया आणि अर्जुन या दोघांची सतत भेट होत असायची. सर्वात आधी सारानेच अर्जुन आणि सानियाची भेट घडवून आणली होती. आता सारा आपल्या बेस्ट फ्रेंडची नणंद होणार आहे.