Join us

कपिल यांची तुलना कोणाशीही कशी करू शकता, गावस्कर यांचा सवाल

कपिल देव आणि हार्दिक पंड्या यांच्यात सातत्याने होत असलेल्या तुलनेवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 09:07 IST

Open in App

मुंबई - कपिल देव आणि हार्दिक पंड्या यांच्यात सातत्याने होत असलेल्या तुलनेवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली. कपिल देवसारखा अष्टपैलू शतकात एकदाच जन्माला येतो आणि त्यांची तुलना कोणाशीही होऊच शकत नाही, असे गावस्कर यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले,' कपिल देव यांची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. एका पिढीतच नव्हे, तर शतकात एकदाच कपिलसारखा खेळाडू घडू शकतो. अगदी सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारखाच. त्यांची तुलना कोणाशीही करूच शकत नाही.'

गावस्कर यांनी भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या कामगिरीवर नाराजी व्यक्ती केली. धवनने इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीत २६ व १३ धावा केल्या. ते म्हणाले,'शिखरला आपल्या खेळात सुधारणा करायची नाही. वन-डे आणि कसोटीत फरक आहे. वन-डेत जसे फटके मारून धावा मिळतात तसे फटके कसोटीत मारून चालत नाही. त्यामुळे कसोटीत खेळात बदल करणे गरजेचे आहे.' 

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत ०-१ अशा पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या कसोटीत भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. लॉर्ड्सवर नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी घ्यावी असेही त्यांनी सुचवले आहे.  

टॅग्स :हार्दिक पांड्याकपिल देवसुनील गावसकरक्रिकेटक्रीडा