Join us

Hong Kong क्रिकेट अन् सगळ्यात छोटा फॉरमॅट! हटके नियमामुळं सचिन तेंडुलकर झालेला Retired Out

भारतीय संघापेक्षा खूप वर्षे आधी खेळला आंतरराष्ट्रीय सामना, आशिया कप स्पर्धेतील पाटी मात्र अजूनही कोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:27 IST

Open in App

Hong Kong Only Team Not Win A Single Match T20 And ODI Asia Cups : यूएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेत हाँगकाँगचा संघ पाचव्यांदा आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या लढतीनं ते यंदाच्या हंगामाची सुरुवात करतील. आतापर्यंत त्यांनी आशिया कप स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही. स्पर्धेत सहभागी होणारा हा एकमेव संघ आहे जो पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पण तुम्हाला पटणार नाही, आशिया कप स्पर्धेत एकही सामना न जिंकणारा टीम इंडियाआधी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय संघापेक्षा खूप वर्षे आधी खेळलाय आंतरराष्ट्रीय सामना

भारतीय संघाने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या इंग्लंड येथील लॉर्ड्सच्या मैदानातून १९३२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास सुरु केला. सध्याच्या घडीला टीम इंडिया क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवत आहे. पण भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरण्याआधी हाँगकाँग क्रिकेट संघानं १८६६ मध्ये शांघाय विरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने इथं जाणून घेऊयात हाँगकाँग क्रिकेटसंदर्भातील खास अन् रंजक गोष्ट

स्टार क्रिकेटरनं शेअर केली साराह सोबतच्या साखरपुड्याची गोष्ट; रोमँण्टिक फोटो व्हायरल

T20 अन्  अन् T10 पेक्षाही छोट्या फॉरमॅटची संकल्पना, तेंडुलकर युवीसह MS धोनीही या स्पर्धेत खेळले

टीम इंडियाआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरूनही ते भलेही मागे असले तरी क्रिकेटवरील प्रेम अन् देशातील क्रिकेटला चालना देण्यासाठी त्यांनी टी-२० आणि टी-२० क्रिकेटला सुरुवात होण्याआधी छोट्या फॉरमॅटमधील खास संकल्पना आणली.जी हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस  (Hong Kong Cricket Sixes Hong Kong Cricket Sixes) या नावाने ओळखली जाते. या स्पर्धेत प्रत्येक संघात सहा खेळाडूंचा समावेश असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंग यांच्यासारखे स्टार खेळले आहेत. 

हटके नियम अन् तेंडुलकर Retired Out झाल्याची गोष्ट

नव्वदीच्या दशकापासून खेळवण्यात येणाऱ्या हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक स्टार्स भारतीय क्रिकेटर्संनी भाग घेतला आहे.१९९३ मध्ये सचिननं या स्पर्धेत ११ चेंडूत ३२ धावांची नाबाद खेळी केलहोती. स्पर्धेतील  हटके नियमामुळे सचिन रिटायर्ड होऊन तंबूत माघारी फिरला होता. ५-६ षटकांच्या सामन्यात वाइड अन् नो बॉलवर दोन धावांच्या नियमासह फलंदाजासाठी खास अन् हटके नियम आहे. ३१ धावा केल्या की फलंदाजाने मैदान सोडायचे, असा या स्पर्धेत नियम आहे. त्यामुळेच हाँगकाँगमधील स्पर्धेत  सचिन तेंडुलकर हा Retired Out होऊन परतला होता. 

टॅग्स :आशिया कप २०२५सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ