Join us

रोहित-विराटनं मनावर नाही घेतलं; पण गिलनं मात्र ते भान जपलं! गावसकर जाम खुश होत म्हणाले...

शुबमन गिलसह बीसीसीआयची ही भूमिका भारतीय कसोटीसाठी शुभ संकेत आहेत, अशा आशयाच्या शब्दांत गावसकरांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:55 IST

Open in App

Sunil Gavaskar On Shubman Gill And BCCI : इंग्लंड दौऱ्यावरील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलनं कॅप्टन्सीसह फलंदाजीत खास छाप सोडली. मोठा दौरा गाजवल्यावर आता शुबमन गिल देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. दुलिप करंडक स्पर्धेत तो उत्तर विभाग संघाचे नेतृत्व करताना दिसेल. त्याने घेतलेल्या या निर्णयावर माजी भारतीय कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावसकर जाम खुश झाले आहेत. शुबमन गिलसह बीसीसीआयची ही भूमिका भारतीय कसोटीसाठी शुभ संकेत आहेत, अशा आशयाच्या शब्दांत गावसकरांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केलीये.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नेमकं काय म्हणाले गावसकर?

बांगलादेश दौरा आगामी वर्षभरासाठी स्थगित करण्यात झालाय. त्यानंतर बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व दिले ही, एक चांगली बाब आहे. आता दुलीप करंडक स्पर्धेसाठी सर्व आघाडीचे खेळाडू उपलब्ध असतील. शुबमन गिल या स्पर्धेत उत्तर विभाग संघाचे नेतृत्व करतोय. त्याने या माध्यमातून एक संदेश दिला आहे. टीम इंडियानं इंग्लंड दौऱ्यावर ६ आठवड्यांत ५ कसोटी सामने खेळले. त्यानंतर शुबमन गिल विश्रांती घेऊ शकला असता. पण त्याने असं न करता देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतलाय. अन्य खेळाडूंनी भारतीय कर्णधाराकडून ही गोष्ट शिकण्याजोगी आहे. 

खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्... रोहित-विराटनं ही गोष्ट फारशी मनावरच नव्हती घेतली

कसोटीतील कामगिरी उंचावण्यासाठी प्रत्येक खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घ्यावी, या गोष्टीवर गावसकरांनी नेहमी जोर दिला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या मंडळींनाही गावसकरांनी सल्ला दिला होता. पण या जोडगोळीनं ती गोष्ट फार मनावर घेतल्याचे दिसले नाही.  शुबमन गिलनं मात्र आगामी कसोटी मालिका लक्षात घेऊन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याच भान जपलं आहे. इंग्लंड दौऱ्यावरुन येऊन त्याने खेळण्याची तयारी दर्शवल्यामुळे गावसकरांना ही गोष्ट चांगलीच भावलीये.  

टॅग्स :शुभमन गिलसुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय