'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन

Hindi Language Debate: भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने हिंदी राष्ट्रीय भाषा नसल्याची भूमिका मांडली. त्याचे भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनीही समर्थन केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:19 IST2025-01-11T17:17:07+5:302025-01-11T17:19:39+5:30

whatsapp join usJoin us
'Hindi is not the national language'; BJP state president K Annamalai supports R. Ashwin's stand | 'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन

'हिंदी राष्ट्रीय भाषा नाही'; आर. अश्विनच्या भूमिकेला भाजप प्रदेशाध्यक्षांचे समर्थन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hindi National Language Debate: माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनच्या एका विधानामुळे हिंदी राष्ट्रीय भाषा आहे की नाही, यावरून वाद छेडला गेला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना आर. अश्विनने मांडलेल्या या भूमिकेचं आता भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनीही समर्थन केले आहेत. ते काय म्हणालेत जाणून घ्या...

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अलिकडेच निवृत्ती घेतलेल्या आर. अश्विनने चेन्नईतील एका खासगी महाविद्यालयातील कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात अश्विनने विद्यार्थ्यांना संबोधित केले. करिअर आणि इतर मुद्द्यावर त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

अश्विनच्या भाषणात हिंदीचा मुद्दा कसा आला होता?

यावेळी आर. अश्विनने विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, तर हिंदी इंग्रजी किंवा तमिळमध्ये विचारा असे म्हटले. अश्विनने जेव्हा हिंदीत कोणाला प्रश्न विचारायचा असेल... असे म्हटले तेव्हा सगळे एकदम शांत झाले. त्यानंतर तो म्हणाला की, 'हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाहीये. ही एक अधिकृत भाषा आहे', असे विधान केले. 

आर. अश्विनचे हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आणि हिंदी राष्ट्रीय भाषा आहे की नाही, मुद्द्यावरून वादविवाद सुरू झाला. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्विनच्या विधानावर काय बोलले?

आर. अश्विनच्या विधानाबद्दल भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी अश्विनच्या विधानाचे समर्थन केले. 

"ही (हिंदी) आपली राष्ट्रीय भाषा नाहीये. असे फक्त माझे मित्र अश्विन यांचेच म्हणणे नाहीये. ही राष्ट्रीय भाषा नाहीये. ही एक संपर्क भाषा होती, ही संवादाची भाषा आहे", अशी भूमिका अन्नामलाई यांनी मांडली. 

यापूर्वी अण्णाद्रमुकचे नेते टीकेएस अलगोवन यांनी म्हटले आहे की, "जेव्हा अनेक राज्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते, अशा वेळी हिंदी राष्ट्रीय भाषा कशी होऊ शकते?"

Web Title: 'Hindi is not the national language'; BJP state president K Annamalai supports R. Ashwin's stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.