OMG : विराट कोहलीनं जगजाहीर केलं टीम इंडियाच्या यशामागचं सिक्रेट; बघा काय म्हणाला...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईत सहकाऱ्यांसोबत क्वारंटाईन कालावधीत आहे. भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 12:01 PM2021-05-31T12:01:46+5:302021-05-31T12:02:09+5:30

whatsapp join usJoin us
Hilarious! Virat Kohli reveals a secret about Team India during Instagram Q/A session | OMG : विराट कोहलीनं जगजाहीर केलं टीम इंडियाच्या यशामागचं सिक्रेट; बघा काय म्हणाला...

OMG : विराट कोहलीनं जगजाहीर केलं टीम इंडियाच्या यशामागचं सिक्रेट; बघा काय म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईत सहकाऱ्यांसोबत क्वारंटाईन कालावधीत आहे. भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तेथे १८ ते २३ जून या कालावधीत न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणार आहे आणि त्यानंतर ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होईल. क्वारंटाईन कालावधी दरम्यान विराटनं रविवारी इंस्टाग्रामवरून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी चाहत्यांनी त्याला त्याच्या मुलीबद्दल, त्याच्या डाएटबद्दल अन् टीम इंडियाच्या यशाबद्दल असे अनेक प्रश्न विचारले. विराटनंही त्यांची उत्तरं दिली. यावेळी विराटनं टीम इंडियाच्या यशामागचं रहस्य सांगून चाहत्यांना अचंबित केलं. ( Virat Kohli reveals a secret about Team India during Instagram Q/A session) 

या सेशनमध्ये भारतीय संघाच्या यशामागचं रहस्य विराटला विचारण्यात आले. त्यावर ३२ वर्षीय विराट म्हणाला की, आमच्या संघात अनेक खोडकर मुलं आहे... विराटच्या या उत्तरानं अनेकांना आश्चर्य वाटलं अन् अनेकांना हसूही आवरता आले नाही. Vamika Virat Kohli : मुलीचा फोटो पोस्ट करण्याच्या विनंतीवर विराट कोहलीचं भन्नाट उत्तर, सांगितला 'वामिका'चा अर्थ!


विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या संघात अनेक असे युवा खेळाडू आहे की जे सोशल मीडियावर एकमेकांची सतत फिरकी घेत असतात. यामध्ये रिषभ पंत, हार्दिक पांड्या, शिखर धवन, युझवेंद्र चहल, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, आदींचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. त्यामुळे विराटचं हे उत्तर खरं ठरतं. जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गात टीम इंडिंयानं दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आमइ इंग्लंड यांच्यासह वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलिया यांच्यावरही विजय मिळवला.   Video : अश्रू, मिठी अन् आनंद; IPL 2021 स्थगित झाल्यानंतर २६ दिवसांनी कुटुंबीयांना भेटले ऑस्ट्रेलियन खेळाडू!

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणाऱ्या टीम इंडियातील सर्व सदस्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि त्यांना दुसरा डोस इंग्लंडमध्ये दिला जाणार आहे. आता सध्या भारतीय खेळाडूंची दररोज कोरोना चाचणी केली जात आहे. भारतीय खेळाडू लंडनमध्ये पोहोचल्यानंतर १० दिवस क्वारंटाईनमध्ये राहतील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर भारत-इंग्लंड यांच्यात नॉटिंगहॅम ( ४ ते ८ ऑगस्ट), लॉर्ड्स ( १२ ते १६ ऑगस्ट), लीड्स ( २५ ते २९ ऑगस्ट), ओव्हल ( २ ते ६ सप्टेंबर) आणि मँचेस्टर ( १० ते १४ सप्टेंबर) असे पाच कसोटी सामने होणार आहेत. लिंबूटिंबू परदेशी खेळाडूंसोबत BCCI उर्वरित सामने खेळवणार, ICCकडे विनंती करणार!

 

Web Title: Hilarious! Virat Kohli reveals a secret about Team India during Instagram Q/A session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.