भारताचा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव ( Kedar Jadhav) यानं कारकिर्दीत नव्या प्रवासाला सुरूवात केली. १४ मार्च २०२१ मध्ये त्यानं कोथरूड येथे स्वतःच्या क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या २०२०मध्ये झालेल्या ऑकलंड येथील वन डे सामन्यात त्यानं शेवटचं टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) त्याला रिलीज केलं. प्रत्यक्ष ऑक्शनमध्ये त्याच्यावर पहिल्या फेरीत कोणीच बोली लावली नाही, परंतु सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) त्याला २ कोटींच्या बेस प्राइजमध्ये आपल्या ताफ्यात करून घेतले. ( Kedar Jadhav Opens Cricket Academy In Pune)
३५ वर्षीय
केदार जाधवनं क्रिकेट अकादमी स्थापन केल्याची घोषणा केली. जाधव मुळचा पुणेकर आहे आणि रणजी करंडक स्पर्धेत तो महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्यानं ७८ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे आणि त्यात त्रिशतकाचाही समावेश आहे. त्यानं ७३ वन डे व ९ ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वन डेत त्याच्या नावावर २ शतकं व ६ अर्धशतकांसह १३८९ धावा आहेत. त्यानं २७ विकेट्सही घेतल्या आहेत. ट्वेंटी-20त त्यानं १२२ धावा केल्या आहेत.
केदार जाधवनं २०१०मध्ये
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पम केलं. त्यानंतर त्यानं चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोची टस्कर्स केरळ आणि आता
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसेल. ९ एप्रिलपासून
आयपीएल २०२१ला सुरुवात होणार आहे. त्यानं आयपीएलमध्ये ८७ सामन्यांत ११४१ धावा केल्या आहेत.