Join us
Daily Top 2Weekly Top 5

U19 World Cup : युवा टीम इंडियाकडून पटेलचा 'पंजा'; वैभव सूर्यवंशीच्या गोलंदाजीवर अमेरिका All Out

पटेलनं 'पंजा' मारल्यावर वैभव सूर्यवंशीही या सामन्यात गोलंदाजी करताना दिसला. एवढेच नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:32 IST

Open in App

United States of America U19 vs India U19, 1st Match : हेनिल पटेलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत  भारतीय संघाने अमेरिकाला अवघ्या १०७ धावांत रोखलं. पटेलनं 'पंजा' मारल्यावर वैभव सूर्यवंशीही या सामन्यात गोलंदाजी करताना दिसला. अमेरिकेच्या डावातील ३६ व्या सामन्यात वैभव सूर्यवंशी गोलंदाजीला आला अन् आपल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने विकेट्सचा डाव साधला अन् अमेरिकेचा संघ ऑलआउट झाला. भारतीय संघाला यंदाच्या हंगामातील स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी फक्त १०८ धावा करायच्या आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आयुष म्हात्रेनं टॉस जिंकला, पहिल्यांदा गोलंदाजी करताना हेनिल पटेलनं 'पंजा' मारला अन्...

भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने U19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हनिन पटेल याने त्याचा निर्णय सार्थ ठरवताना अर्धा संघ एकट्याने तंबूत धाडला. ७ षटकात फक्त १६ धावा खर्च करताना त्याने पाच विकेट्सचा डाव साधत यंदाच्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने गोलंदाजीत आपली खास छाप  सोडली. त्याच्याशिवाय दिपेश देवेंद्रन. अंब्रिश आणि खिलान पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. वैभव सूर्यवंशीनं पहिले षटक टाकताना दुसर्याच चेंडूवर विकेटचा डाव साधला.

Vaibhav Suryavanshi Record : U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशा...

अमेरिकेच्या संघाकडून फक्त चौघांनीच गाठला दुहेरी आकडा, तेही...

नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना धावफलकावर अवघी एक धाव असताना अमेरिकेच्या संघाने आपली पहिली विकेट गमावली. साहिल गर्ग १६ (२८), विकेट किपर बॅटर अर्जुन महेश १६ (२९), अदनित झांब १८ (४१) आणि नितीश सुदीनी याने ५२ चेंडूत केलेल्या ३६ धावा वगळता अन्य कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. ज्या चौघांनी दुहेरी आकडा गाठला त्यांनी चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयश आले.  संघाच्या धावफलकावर ८० धावा असताना अमेरिकेच्या संघाने ७ विकेट्स गमावल्या होत्या. त्यांनी कशी बशी शंभरी पार केली.  

English
हिंदी सारांश
Web Title : U19 World Cup: Patel's 'Five-fer,' Suryavanshi's Bowling All-Outs USA

Web Summary : Henil Patel's lethal bowling restricted USA to 107 in the U19 World Cup opener. Vaibhav Suryavanshi took a wicket on his second ball as team India now needs 108 runs to win.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपवैभव सूर्यवंशीआयुष म्हात्रेभारतीय क्रिकेट संघ