Join us  

शेतकऱ्यांना जमेल तशी, जमेल तितकी मदत करा; अजिंक्य रहाणेचं आवाहन

अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना हवालदील केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 11:42 AM

Open in App

सांगली आणि कोल्हापूरला आलेल्या पूरात अनेकांचे संसार मोडून पडले. अनेक जण अजूनही त्या महाप्रलयात झालेल्या नुकसानातून सावरत आहेत. कोपलेल्या निसर्गामुळे झालेल्या नुकसानातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अनेकांनी हातभार लावला. त्यात एक क्रिकेटपटू म्हणून अजिंक्य रहाणेने प्रथम पुढाकार घेतला. आता अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना हवालदील केलं आहे. राजकारणी दुष्काळ दौरे काढत आहेत. अजिंक्यनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करा, असे आवाहन केलं आहे. 

सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला होता. रहाणेनेही त्यावेळी मदत केली होती आणि सोशल मीडियावर त्यानं आवाहन केलं होतं. त्यानं लिहिलं होतं की,'' आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.''

आता रहाणेनं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला," आपल्या ताटात जे अन्न येतं ते शेतकऱ्यांच्या कष्टामुळे. शेतकऱ्यांना आपण नेहमी मदत करायला हवी. मी याधीही सांगितलं आहे की माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मी करेन, करत राहिन. शेतकारी दिवस रात्र मेहनत घेतात त्यामुळे आपल्याला जेवण मिळते. मी घरी असो किंवा हॉटेलमध्ये जेव्हा जेवतो ते शेतकऱ्यांमुळेच. त्यामुळे त्यांना कधी विसरू नये आपल्याकडून जी काही मदत करता येईल ती करावी." 

टॅग्स :अजिंक्य रहाणेशेतकरीमहाराष्ट्र