Join us

हीथ स्ट्रीकवर घातली आठ वर्षांची बंदी- आयसीसी; आयपीएलमध्ये होता दोन संघांचा प्रशिक्षक

दुबई : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि  उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित असलेला  हीथ स्ट्रिक याच्यावर आयसीसीने आठ ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:04 IST

Open in App

दुबई : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि  उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित असलेला  हीथ स्ट्रिक याच्यावर आयसीसीने आठ वर्षांसाठी बंदी घातली आहे. स्ट्रीकने भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली दिली असून, आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. २०१६ च्या आयपीएलमध्ये स्ट्रीक गुजरात लायन्सचा तर, २०१८ च्या पर्वात तो कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होताझिम्बाब्वेच्या महान गोलंदाजांपैकी एक असलेला स्ट्रीक २०१७ ते २०१८ दरम्यान अनेक सामन्यांमध्ये संशयाच्या भोवऱ्यात होता. प्रशिक्षक म्हणूनही त्याच्यावर अनेक सामन्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. हे सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल, बांगलादेश प्रीमियर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमियर लीग यांच्याशी निगडित होते. स्ट्रीकनेही या आरोपांविरोधात अपील केले; पण शेवटी त्याने आपली चूक कबूल केली. आता तो आठ वर्षे कोणत्याही क्रिकेट कार्यात सहभागी होऊ शकणार नाही.

स्ट्रीकची कारकीर्दझिम्बाब्वेकडून स्ट्रीकने ६५ कसोटी आणि १८९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. गोलंदाज म्हणून त्याने २१६ कसोटीत आणि २३९  एकदिवसीयमध्ये बळी घेतले. याशिवाय स्ट्रीकने कसोटीत १९९० आणि वन डेत  २९४२ धावादेखील केल्या. २००५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. यानंतर स्ट्रीक याने इंग्लंडमध्ये कौंटी संघ  वॉर्विकशायर क्रिकेट क्लबचे कर्णधारपद भूषविले होते.

टॅग्स :आयसीसीआयपीएल २०२१