Join us  

हार्दिक पांड्याचा षटकार त्या प्रेक्षकाला पडला महागात

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्यानं आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याची ही फटकेबाजी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला चांगलीच महागात पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 9:07 PM

Open in App

बंगळुरू - काल झालेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 21 धावांनी पराभव केला.  भारतीय संघातील खेळाडूंनी काल चांगली कामगिरी केली मात्र ते आपला पराभव रोखू शकले नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्यानं आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्याची ही फटकेबाजी सामना पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला चांगलीच महागात पडली आहे.

हार्दिक पंड्याने स्टेडियममध्ये भिरकावलेला चेंडू लागून एका प्रेक्षकाचा खालचा ओठ फुटलाय आणि दातही हललेत. तोसित अग्रवाल (24) असे या जखमी प्रेक्षकाचे नाव आहे. स्टेडियमवरील पॅव्हेलियन-1 मध्ये तोसित बसला होता. पंड्याने चेंडू भिरकावून षटकार मारला पण भिरकावलेला चेंडू ओठ आणि दातांना जोरात लागल्यामुळे तोसित जखमी झाला. त्याचा खालचा ओठ फुटला तसेच पुढचे दात हलले.तोसितला खालचा ओठ आणि दातांजवळ खोल जखम झाली असून त्याचा एक दातही हलत आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याने चेंडू चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश आले नाही. आता त्याची प्रकृती सुधारत आहे, असे स्टेडियमच्या मेडिकल कमांड सेंटरचे अध्यक्ष डॉ. अजित बेनडिक्ट यांनी सांगितले.

बंगळुरुतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियायाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३३४ धावा उभारल्यानंतर भारताची ५० षटकात ८ बाद ३१३ धावा अशी मर्यादित मजल राहिली. यासह ऑस्ट्रेलियायाने आपली पराभवाची मालिका खंडित करतानाच भारताच्या सलग ९ सामन्यांतील विजयी घोडदौडही रोखली.

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रिकेटबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया