ऐकावं ते नवलंच! गोलंदाजाला पाठ दाखवून तो उभा राहीला आणि चक्क चौकार लगावला; व्हिडीओ वायरल

सध्याच्या घडीला क्रिकेटचा एक व्हिडीओ वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 19:36 IST2019-11-01T19:35:00+5:302019-11-01T19:36:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
He stood up and struck the bowler with his back to the bowler; Video viral | ऐकावं ते नवलंच! गोलंदाजाला पाठ दाखवून तो उभा राहीला आणि चक्क चौकार लगावला; व्हिडीओ वायरल

ऐकावं ते नवलंच! गोलंदाजाला पाठ दाखवून तो उभा राहीला आणि चक्क चौकार लगावला; व्हिडीओ वायरल

मुंबई : क्रिकेट जगतामध्ये कधी काय होईल, हे सांगता येत नाही. सध्याच्या घडीला क्रिकेटचा एक व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक फलंदाज गोलंदाजाकडे पाठ फिरवून फलंदाजीसाठी उभा असलेला दिसतोय. पण तो पाठ करून उभा राहीला असला तरी त्याने चौकाल वसूल केल्याचेही दिसत आहे.

क्रिकेट जगातमध्ये फलंदाजीसाठी उभ्या राहण्याच्या विविध शैली आहेत. पण अजूनपर्यंत अशी शैली कोणीही पाहिली नव्हती. गोलंदाजाला पाठ दाखवण्याचे धाडस अजूनपर्यंत एकाही फलंदाजाने केले नव्हते. पण आता मात्र या फलंदाजाने ही गोष्ट करून दाखवली आहे.

Image

ही गोष्ट घडली आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारानेच ही गोष्ट केली आहे. एका स्थानिक सामन्यात ही गोष्ट घडली आहे. ऑस्ट्रेलियामधील टास्मानिया संघातून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली फलंदाजी करत होता. यावेळी गोलंदाजाला पाठ दाखवून तो खेळत असल्याचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Web Title: He stood up and struck the bowler with his back to the bowler; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.