Indian Premier League ( IPL 2020)मध्ये आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) किरॉन पोलार्ड व नॅथन कोल्टर नायलच्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्ध ६ बाद १७६ धावा चोपल्या. पण, या सामन्यात नेटिझन्समध्ये चर्चा रंगली ती अष्टपैलू हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya)... या सामन्यात हार्दिक नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसला. मग काय नेटिझन्सनी मीम्सचा पाऊस पाडला.. 
मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात रोहित शर्माला ( ९) माघारी पाठवून KXIPनं मोठं यश मिळवलं. अर्शदीप सिंगनं हिटमॅनचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू न देता बाद केले. अर्शदीपनं ६व्या षटकात इशान किशनला ( ७) बाद करून MIला कोंडीत पकडले. क्विंटन डी'कॉक एका बाजूनं खिंड लढवत आहे. क्विंटन आणि कृणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची ५८ धावांची भागीदारी रवी बिश्नोई यानं तोडली. कृणाल ३४ धावांवर माघारी परतला.
क्विटन डी'कॉकनं सातत्यपूर्ण खेळ करताना ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पण, ख्रिस जॉर्डननं MI ला धक्का देताना क्विंटनचा झंझावात रोखला. क्विंटन ४३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा करून माघारी परतला. किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. अर्शदीप सिंगच्या एका षटकात पोलार्ड व नॅथन कोल्टर नायर यांनी दोन षटकार व दोन चौकारांसह २२ धावा चोपून काढल्या.  या दोघांनी नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या.