Join us  

विराट कोहलीला सगळ्यात जास्त आवडते 'ही' खास व्यक्ती; अनुष्कापेक्षाही जास्त?

वर्ल्ड कप अपयश मागे सोडून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यातून नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 4:36 PM

Open in App

मुंबई : वर्ल्ड कप अपयश मागे सोडून भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यातून नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात शनिवारी ट्वेंटी-20 सामन्यानं होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंनी मियामीच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. कर्णधार विराट कोहलीही पत्नी अनुष्का शर्मासोबत मियामीत दिसला. पण, कोहलीला आयुष्यात एक व्यक्ती ही सर्वात जास्त आवडते, अगदी अनुष्का शर्मापेक्षाही जास्त? कोण आहे ती?

पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आयुष्यात इतरांपेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे, असे कर्णधार कोहलीनं सांगितले. रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यातील सर्वश्रेष्ठ कोण हा वाद सुरू होता आणि राहिलही. पण, कोहलीनं आपलं मत रोनाल्डोच्या पारड्यात टाकले आहे. तो म्हणाला,''माझ्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सर्वांच्या आधी आहे. त्याची खेळाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम याला तोड नाही. तो आव्हानं स्वीकारतो आणि ती पूर्णही करतो. मी पाहिलेल्या खेळाडूंमध्ये रोनाल्डो हा परिपक्व खेळाडू आहे. तो अनेकांचा प्रेरणास्रोत आहे. तो मला खूप आवडतो.'' 

मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदचा माजी खेळाडू आता युव्हेंटसकडून खेळतो. रोनाल्डोचा युव्हेंटसमध्ये जाण्याचा निर्णय अनेकांना पटलाही नसेल, परंतु त्यानं तेथेही आपली हुकुमत दाखवून दिली आहे. '' युव्हेंटसला फॉलो करण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे रोनाल्डो. ज्या ज्या क्लबकडून तो खेळला त्याला माझा पाठींबा असेल. त्याच्याकडून मला प्रेरणा मिळते,'' असेही कोहली म्हणाला.

रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यानंतर जागतिक फुटबॉलमध्ये कोणाचे वर्चस्व असेल, यावर कोहली म्हणाला,''फ्रान्सचा 20 वर्षीय कायलिन मॅबाप्पे... 2018च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात त्यानं केलेला खेळ कायम स्मरणात राहीला आहे. आगामी काळात त्याचाच दबदबा असेल.''

बाबो... इंस्टाग्रामवरील एका पोस्टवर रोनाल्डोची छप्परफाड कमाई; कोहली त्याच्या जवळपासही नाही 

टॅग्स :विराट कोहलीख्रिस्तियानो रोनाल्डो