लंडन : भारतात क्रिकेट हा महत्त्वाचा खेळ असला तरी जगभरात अजून त्याचा प्रसार हवा तसा झालेला नाही. त्यामुळे आजही जगभरात फुटबॉल, बास्केटबॉल ( NBA), सॉकर यांचाच दबदबा आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन, प्रायोजकांकडून मिळणारी रक्कम आदी सर्व आपल्याला अचंबित करणारे असले तरी जगभरातील टॉप खेळाडूंच्या तुलनेत हा आकडा फार कमीच वाटेल. सध्याच्या घडीला जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर आहे. इंस्टाग्रामवरील त्याला एका पोस्टसाठी मिळत असलेली रक्कम पाहून सर्वांनाच चक्कर येईल... भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल दहा खेळाडूंत नवव्या स्थानी असला तरी त्याला मिळणारी रक्कम ही रोनाल्डोपेक्षा किती कमी आहे, हे पाहिल्यावरच कळेल. 

फुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल

रेयाल माद्रिदची साथ सोडल्यानंतर इटालियन क्लब युव्हेंटसकडून खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या रोनाल्डोची लोकप्रियता कमी होईल, असा कयास बांधला जात होता. पण, प्रत्यक्षात रोनाल्डोची लोकप्रियता आणखी वाढली आहे. इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डोनं अव्वल स्थान पटकावलं आहे. कोहलीनं या क्रमवारीत नववे स्थान कायम राखले आहे आणि अव्वल दहामध्ये स्थान पटकावणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.  


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी जवळपास  158000 पाउंड (13554109) म्हणजेच 1 कोटी 35 लाख रुपये कमावतो. इन्स्टाग्रामवर कोहलीचे 2 कोटी 25 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामकडून सर्वाधिक कमाई करणा-या खेळाडूंमध्ये विराट नवव्या स्थानावर आहे.
    
Hopper HQनं दिलेल्या वृत्तानुसार रोनाल्डोला एका पोस्टसाठी £784,000 ( जवळपास 7 कोटी) इतकी रक्कम मिळत आहे. त्यानंतर ब्राझीलचा नेयमार £580,000, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी $648,000 यांचा क्रमांक येतो.

राजा उदार झाला; रोनाल्डोने हॉटेलात दिलेल्या 'टिप'चा आकडा पाहून गरगराल!

रोनाल्डोकडून जगातील सर्वात महागड्या कारची खरेदी

टॉप टेन
ख्रिस्तियानो रोनाल्डो - 6.73 कोटी
नेयमार - 4.97 कोटी
लिओनेल मेस्सी -  4.46 कोटी
डेव्हिड बेकहॅम - 2.46 कोटी
लेब्रोन जेम्स - 1.87 कोटी
रोनाल्डीन्हो - 1.76 कोटी
गॅरेथ बेल - 1.50 कोटी
ज्लाटन इब्राहिमोव्हीक - 1.38 कोटी
विराट कोहली - 1.35 कोटी
लुईस सुआरेज - 1.26 कोटी 


Web Title: Cristiano Ronaldo leads Instagram's highest-paid list; Virat Kohli breaks into top 10
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.