- सौरव गांगुली भारत-इंग्लंड मालिका मध्यांतरापर्यंत आली आहे. तिसऱ्या कसोटीत खºया अर्थाने भारताची परीक्षा असेल. लॉर्डस्च्या उसळी घेणाºया खेळपट्टीवर फलंदाज स्विंग माºयास बळी पडले. तिस-या कसोटीत हे चालणार नाही. द. आफ्रिकेत मुसंडी मारली त्याची पुनरावृत्ती करण्याची हीच वेळ आहे.०-२ ने माघार झाली हे खरे, पण अद्यात तीन सामने शिल्लक आहेत. पावसाचा व्यत्यय न आल्यास पुढील तिन्ही सामन्यांचा निकाल येईल, यात शंका नाही. आम्ही सर्वकाही गमावलेले नाही. भारतीय संघ झुंजारवृती दाखवेल का, हा यक्षप्रश्न आहे. फलंदाज सहज बाद होत असल्याने मुसंडी मारणे आव्हानात्मक आहे. आव्हान कठीण असले तरी अशक्यप्राय नाही. त्यासाठी आत्मविश्वास हवा. कोहली दोन्ही सामन्यात प्रभावी ठरला. पण एकटा कोहली सामने जिंकू शकत नाही. सचिनच्या काळात भारतीय संघ देदीप्यमान यश मिळवू शकला कारण त्याच्यासह अनेक सहकारी धावा काढत होते. विजय, पुजारा, रहाणे,आणि धवन यांनीही विश्वासाने खेळायला हवे. याआधी त्यांनी संघाला सावरले आहेच. हा आत्मविश्वास इंग्लंडविरुद्ध विजय पथावर आणू शकेल.लॉर्डस्वर मोक्याच्या क्षणी अॅन्डरसन व इतर गोलंदाजांपुढे नांगी टाकल्याने भारतीय फलंदाजांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले. त्यांनी बाद होण्यापूर्वी झुंजारवृत्ती दाखविली नव्हती. तरीही भारत मुसंडी मारू शकतो, असा विश्वास आहे. भारताला चांगल्या सुरुवातीची गरज आहे. धवन, विजय यांच्याकडून भक्कम खेळी होण्याची गरज आहे. इंग्लंडमध्ये यशस्वी व्हायचे झाल्यास मधल्याफळीनेही योगदान द्यावे. भारत करुण नायरला सहावा फलंदाज म्हणून खेळविणार का, हा देखील एक चांगला पर्याय असेल.बुमराह परतल्याने गोलंदाजी आणखी भक्कम झाली. शमी फॉर्ममध्ये असून ईशांतला कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. चांगल्या चेंडूवरही एकेरी धावा मोजाव्या लागणे चिंतेचा विषय ठरतो. स्टोक्सचे पुनरागमन इंग्लंडसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्यामुळे संघ गोलंदाजी व फलंदाजीत आणखी बलाढ्य बनला. ट्रेंटब्रिजवर चेंडू अधिक स्विंग होतो. अशावेळी ब्रॉड व अॅन्डरसन यांच्यावरही लक्ष असेल. भारताने मात्र आशा सोडू नये. (गेमप्लान)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विजयासाठी आत्मविश्वास हवा
विजयासाठी आत्मविश्वास हवा
भारत-इंग्लंड मालिका मध्यांतरापर्यंत आली आहे. तिसऱ्या कसोटीत खºया अर्थाने भारताची परीक्षा असेल. लॉर्डस्च्या उसळी घेणाºया खेळपट्टीवर फलंदाज स्विंग माºयास बळी पडले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 04:07 IST