पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी संघाला गुरुवारी इस्लामाबाद युनायटेड संघाकडून ६ विकेट्सनं हार मानावी लागली. पेशावर संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. या सामन्यात बाबर आजमने नाबाद ७५ धावांची केळी केली, परंतु त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. इस्लामाबाद संघाने १५७ धावांचे हे लक्ष्य १४.५ षटकांत पार केले. इस्लामाबादच्या रहमनुल्लाह गुर्बाजने ३१ चेंडूंत ६२ धावांची खेळी करताना ७ चौकार व ४ षटकार खेचले. पेशावर संघासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते, परंतु त्यांना अपयश आले.  
दरम्यान, या सामन्यात पेशावर संघाचा कर्णधार बाबर फलंदाजी करताना काही गमतीदार प्रसंग निर्माण करताना दिसला. गोलंदाज हसन अली ( याने भारतीय मुलीशी केलंय लग्न) याच्या षटकात एक धाव घेत असताना बाबरने त्याच्यावर गमतीने बॅट उगारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. धाव घेत असताना हसन मध्येच होता आणि त्यावेळी बाबरने बॅट उगारून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्याच हसन अलीने या सामन्यात ३५ धावा ३ विकेट्स घेत प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला.  
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये 
बाबर आजम रागाने बॅट खेळपट्टीवर फेकताना दिसतोय. मोहम्मद हॅरीस व बाबर यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. हॅरीसने २१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४० धावा चोपल्या. पण, त्याची विकेट पडली अन् पेशावरच्या फलंदाजांनी रांग लावली. बाबर एकटा खेळपट्टीवर खिंड लढवताना दिसला. त्यामुळे बाबर संतापला होता.  
 
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"