Haryana vs Jharkhand SMAT 2025 Final Live Streaming : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात छोट्या प्रारुपातील ३२ संघाचा सहभाग असणारी सर्वात मोठी आणि प्रतिष्ठीत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याच्या मैदानात रंगणार आहे. बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाबाहेर असणाऱ्या ईशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंड आणि अंकित कुमारच्या नेतृत्वाखालील हरयाणा संघ यांच्यात जेतेपदासाठीची लढत पाहायला मिळेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
SMAT स्पर्धेत मिळणार नवा विजेता
दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेत नवा विजता मिळणार हे पक्के आहे. ईशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंड इतिहास रचणार की, हरयाणाचा संघ फायनल बाजी मारणार ते बघण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात कधी आणि किती वाजता रंगणार देशांतर्गत टी-२० स्पर्धेतील फायनलचा थरार? कसा पाहता येईल हा सामना यासंदर्भातील सविस्तर माहिती
आधी गंभीरसोबत ओपनिंग; आता IPL लिलावात 'त्या' खासदाराच्या लेकावर शाहरुखच्या KKR नं लावला पैसा!
कधी आणि कुठं रंगणार सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील फायनल सामना?
हरयाणा विरुद्ध झारखंड यांच्यातील अंतिम सामना १८ डिसेंबरला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याच्या मैदानात रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार, दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. ४ वाजता दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
Haryana vs Jharkhand SMAT 2025 Final Live Streaming कुठं पाहता येईल?
सयद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनल लढत जियो हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. याशिवाय स्टार स्पोर्ट्स चॅनेलवरही या सामन्याचे थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे.
झारखंडचा संघ :
इशान किशन (कर्णधार/यष्टीरक्षक) विराट सिंह, कुमार कुशाग्र, रॉबिन मिंझ,अनुकुल रॉय, पंकज कुमार, राजनदीप सिंग, बाळ कृष्ण,
विकास सिंग, सुशांत मिश्रा, सौरभ शेखर,अमित कुमार, उत्कर्ष सिंग.
हरयाणाचा संघ :
अंकित कुमार (कर्णधार), यशवर्धन दलाल (यष्टीरक्षक),अर्श रंगा, निशांत संधू, आशिष सिवाच, सामंत जाखड, पार्थ वत्स, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अमित राणा, इशांत भारद्वाज, विवेक नरेश कुमार, अनुज ठकराल, अर्पित राणा, भुवन रोहिल्ला,
मयंक शांडिल्य, युवराज योगेंद्र सिंग, युझवेंद्र चहल.