IND vs ENG : टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याआधी स्फोटक फलंदाजाला मिळालं प्रमोशन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याआधी या खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:46 IST2025-01-21T16:45:19+5:302025-01-21T16:46:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Harry Brook Named England's New White Ball Vice Captain Ahead Of India Series | IND vs ENG : टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याआधी स्फोटक फलंदाजाला मिळालं प्रमोशन

IND vs ENG : टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याआधी स्फोटक फलंदाजाला मिळालं प्रमोशन

India vs England T20 Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेला २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात रंगणाऱ्या या सामन्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डानं मोठा निर्णय घेतलाय. टीम इंडियाविरुद्धच्या मर्यादीत सामन्यांच्या मालिकेसाठी जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघात हॅरी ब्रूकवर उप कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आलीये. 

 लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारत दौऱ्यावर ब्रूकला मिळालं प्रमोशन

इंग्लंडचा संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसह भारत दौऱ्यावर ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. या मालिकेतही हॅरी ब्रूक उप कर्णधार असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी दोन्ही संघांसाठी ही अखेरची मालिका असेल. ही मालिका संपल्यावर १९ फेब्रुवारीपासून दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सज्ज असतील. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 'अ' गटात असून इंग्लंडचा संघ हा 'ब' गटात आहे. 

२०२२ मध्ये केलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

२५ वर्षीय हॅरी ब्रूक याने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मैदानातील दमदार कामगिरीसह अल्पावधितच त्याने इंग्लंडच्या संघात तिन्ही फॉर्मेटमध्ये आपल नाव पक्कं केले आहे. आता उप कर्णधारपदाची जबाबदारीही या युवा क्रिकेटकडे देण्यात आलीये. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) सोमवारी रात्री मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ब्रूकला उपकर्णधार म्हणून घोषित केले.

आधी इंग्लंड संघाची कॅप्टन्सी केलीये, तो खेळलेला पण संघानं गमावली होती मालिका

याआधी ब्रूकनं इंग्लंडच्या संघाचे नेतृत्वही केल्याचे पाहायला मिळाले आहे. गतवर्षी घरच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केले होते. कॅप्टन्सीचा दबाव घेता त्याने अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यात त्याने १ शतक आणि २ अर्धशतकांसह ३१२ धावा केल्या होत्या.  पण त्याच्या नेतृत्वाखाल इंग्लंडच्या संघानं ही मालिका २-० अशी गमावली होती.  
 

Web Title: Harry Brook Named England's New White Ball Vice Captain Ahead Of India Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.