हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने अवस्मरणीय कामगिरी करून दाखवत इतिहास रचला आहे. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिली वहिली ICC ट्रॉफी जिंकली. या कामगिरीसह हरमनप्रीत कौर कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या खास एलिट क्लबमध्ये सामील झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कपिल पाजी, धोनी यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी हरमन ठरली पहिली
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने १९८३ मध्ये पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्या काळात वेस्ट इंडिजची मक्तेदारी संपवत कपिल देव हे भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे पहिले कर्णधार ठरले होते. २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या हंगामात महेंद्रसिंह धोनीनं इतिहास रचला. तो भारताला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारा पहिला कर्णधार ठरला. त्यानंतर आता हरमनप्रीत कौर महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देणारी पहिली कर्णधार ठरली आहे. सोशल मीडियावर महिला क्रिकेट संघासह कर्णधार हरमनप्रीत कौर चर्चेचा विषय ठरत आहेत. आता हरमनप्रीतची एक खास पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
हरमनप्रीत कौरनं खास फोटो शेअर करत दिलेला संदेश ठरतोय लक्षवेधी
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने जेतेपद मिळवल्यावर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास फोटो शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्वप्नपूर्तीनंतर ती ट्रॉफी कुशीत घेऊन झोपल्याचे दिसते. हा फोटो शेअर करताना हरमनप्रीतनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, काही स्वप्न ही अब्ज लोक एकत्र पाहतात. त्यामुळेच क्रिकेट हा सर्वांचा खेळ आहे. हरमनप्रीतच्या टी शर्टवर Cricket is a Gentleman's game everyones game असे लिहिले आहे. यातील 'अ जेंटलमन्स' शब्द खोडत भारतीय वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार हा खेळ फक्त पुरुषांचा नाही तर सर्वांचा आहे, असा संदेश दिला आहे.