भारतीय महिला संघ घरच्या मैदानात पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून जगात भारी ठरला. नवी मुंबईच्या मैदानातील ऐतिहासिक विजयासह देशानेच नव्हे तर साऱ्या जगाने भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन' पाहिले. तिसऱ्या प्रयत्नात विश्वविजेतेपदाला गवसणी घालत भारतीय महिला संघाच्या रुपात महिला क्रिकेट जगतात नवा आणि चौथा चॅम्पियन संघ मिळाला. जगात भारी ठरलेल्या 'रन'रागिणींच देशभरातून कौतुक होत आहे. त्यानंतर आता देशाची राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानी जग जिंकणाऱ्या लेकींचा कौतुक सोहळा अगदी थाटात पार पडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेहनतीनं कमावलेला मोठा 'दागिना' घेऊन टीम इंडिया PM मोदींच्या भेटीला
विश्वविजेतेपदाची ट्रॉफी घेऊन भारतीय महिला संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सर्वांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. इथं मोठ्या थाटामाटात सर्व विश्वविजेत्या संघातील सदस्याचं स्वागत करण्यात आले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने कठोर मेहनतीनं कमावलेला मोठा 'दागिना' अर्थात विश्वचषकाची ट्रॉफी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती दिली. मग फोटो सेशन झालं अन् सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी पंतप्रधानांशी गप्पा गोष्टीही केल्या. या खास भेटीत भारताची विश्वचॅम्पियन कर्णधार हरमनप्रीतनं पंतप्रधानांना खास जर्सी गिफ्ट केल्याचेही पाहायला मिळालं.
आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल
विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजली नंबर वन NAMO जर्सी
भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत कौर हिने या खास भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास जर्सी भेट दिली. भारतीय संघाकडून मोदींना 'नंबर वन' NAMO जर्सी देण्यात आली. ही जर्सी विश्वविजेत्या लेकींच्या स्वाक्षरीनं सजलेली होती. क्रिकेटच्या मैदानात कर्तृत्व सिद्ध केल्यावर जर्सीवर उमटलेल्या स्वाक्षरीच्या रुपात भारतीय महिला संघाचे 'अच्छे दिन'चं चित्र यातून दिसून येते. हरमनप्रीत कौरनं यावेळी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. २०१७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धच्या फायनलमध्ये ९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. हरमनप्रीत या संघाचा भाग होती. यावेळीही भारतीय संघाने मोदींची भेट घेतली होती.