Join us

ट्वेंटी-२०त धोनी, रोहितला न जमलेला विक्रम भारताच्या 'या' पोरीनं केला

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी व भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्माला देखील न जमाणारा विक्रम केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 21:04 IST

Open in App

मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सोबतच भारतीय संघाचा सलमी फलंदाज रोहित शर्माला मागे सरत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या नावावर विक्रम केला आहे.

सुरत येथील लालाभाई काँट्रक्टर स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका विरुद्धच्या सहाव्या ट्वेंटी- 20 सामन्यासाठी मैदानावर उतरुन हरमनप्रीत कौरने आपल्या नावावर ट्वेंटी 20मध्ये विक्रम नोंदविला आहे. हरमनप्रीत कौरने महेंद्र सिंग धोनी व रोहित शर्माला देखील न जमाणारा विक्रम केला आहे. ट्वेंटी 20चे 100 सामने खेळणारी हरमनप्रीत कौर पहिली पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आतापर्यत 98 ट्वेंटी 20 सामने खेळला आहे, तर सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा देखील 98 ट्वेंटी 20 सामने खेळला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतीय संघाच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकत एक नवा विक्रम आपल्या नावी केला आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरोहित शर्माभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयभारत