तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ!

Hardik Pandya and Jonny Bairstow Viral Video: आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरातचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:04 IST2025-06-01T16:01:25+5:302025-06-01T16:04:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandyas Funny Song Leaves Jonny Bairstow Confused After IPL 2025 Eliminator Win | तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ!

तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ!

आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स दारुण पराभव केला. या विजयानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोचे कौतुक केले. या सामन्यात जॉनी बेअरस्टोने अवघ्या २२ चेंडूत ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी एक गाण गायले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
राभव 
नुकताच मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत हार्दिक पांड्या हा "जॉनी! जॉनी! जॉनी बेबी! तेरी मेरी है कहानी!", असे गाताना दिसत आहे. त्यावेळी हार्दिक पांड्या काय बोलत आहे, हे न समजल्याने बाजूला बसलेला जॉनी बेअरस्टो क्षणभर गोंधळून गेल्याचे दिसले.

जॉनी बेअरस्टोने संधीचे सोने केले!
गुजरात विरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विल जॅक्सच्या जागी जॉनी बेअरस्टोला संधी दिली. त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने अवघ्या २२ चेंडूत ४७ धावांची वादळी खेळी केली. रोहित शर्मासोबतच्या त्याच्या जबरदस्त सलामी भागीदारीमुळे मुंबईच्या संघाने गुजरातसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाला २० धावांनी पराभव पत्कारावा लागला. 

मुंबईचा संघ आज पंजाबशी भिडणार
या विजयासह मुंबईच्या संघाने आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी मुंबईचा संघ आज पंजाब किंग्जशी भिडणार आहे. 

Web Title: Hardik Pandyas Funny Song Leaves Jonny Bairstow Confused After IPL 2025 Eliminator Win