Join us

नववर्षाच्या स्वागताला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करून हार्दिक पांड्याने केली अशी कमेंट्स 

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 17:14 IST

Open in App

नवी दिल्ली - भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडून हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र या काळात तो सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या याने नववर्षाचे स्वागत गर्लफ्रेंड नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत केले. तसेच तिच्यासोबतचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याने त्याखाली एक मजेशीर कमेंट्सही केली आहे. त्यात तो म्हणतो ''नव्या वर्षाची सुरुवात मी माझ्या फायरवर्क (फटाका)सोबत करत आहे.''  हार्दिक पांड्याचे हे छायाचित्र सध्या त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच ही जोडी कायम एकत्र राहावी, अशा शुभेच्छा चाहत्यांकडून देण्यात येत आहेत. पांड्याला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये त्याच्या दोन संघसहकाऱ्यांचाही समावेश आहे. ते सहकारी म्हणजे युझवेंद्र चहल आणि के.एल. राहुल होय.  

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तसेच ते दोघेही लवकरच विवाह करणार असल्याची चर्चा आहे. हार्दिक पांड्या यांने नताशाची आपल्या कुटुंबीयांशीसुद्धा भेट घालून दिली आहे.  

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघ