Join us

हार्दिक पांड्या ट्रोल; नेटिझन्सकडून मॉडेलिंग करण्याचा खोचक सल्ला

भारतीय संघाच्या इंग्लंड कसोटी मालिकेतील कामगिरीवर चांगलीच टीका होत आहे. त्या पराभवाचा राग व्यक्त करण्याची एकही संधी नेटिझन्स सोडत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 08:39 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाच्या इंग्लंड कसोटी मालिकेतील कामगिरीवर चांगलीच टीका होत आहे. त्या पराभवाचा राग व्यक्त करण्याची एकही संधी नेटिझन्स सोडत नाहीत. इंग्लंड मालिकेतील ४-१ अशा पराभवानंतर भारतीय खेळाडूही सोशल मीडियावर चाहत्यांना आपली बाजू पटवून देत असल्याचे चित्र आहे. पण, त्यावरही चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागत आहे. असाच अनुभव हार्दिक पांड्याला आला. चाहत्यांनी तर त्याला क्रिकेट सोड मॉडेलिंग कर असा खोचक सल्लाही दिला. आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी पांड्याने इंस्टाग्रामवर इंग्लंड मालिकेतील कामगिरीबद्दल दुखी असल्याचा मॅसेज पोस्ट केला. पण त्यासोबत त्याने एक कुल फोटोही पोस्ट केल्याने तो ट्रोल झाला. 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतबीसीसीआय