Join us

Shubman Gill Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: हार्दिकचा विश्वासू शुबमन गिलचा 'दिल्ली'ला दणका! गुजरातच्या संघाने १७० पार मारली मजल

शुबमन गिलचं शतक हुकलं, पण त्याने गुजरात संघाला मोठी मजल मारून दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 21:24 IST

Open in App

Shubman Gill Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने २० षटकांत ६ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर शुबमन गिलची ८४ धावांची खेळी आणि हार्दिक पांड्याबरोबर (३१) झालेली त्याची उपयुक्त भागीदारी याच्या जोरावर गुजरात १७०चा टप्पा ओलांडला आणि रिषभ पंतच्या दिल्ली संघाला १७२ धावांचे आव्हान दिले. दिल्लीकडून आजच्या सामन्यात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या मुस्तफिजूर रहमानने ३ बळी टिपले.

प्रथम फलंदाजी आलेल्या गुजरातला पहिला धक्का लवकर बसला. मॅथ्यू वेड विचित्र फटका खेळताना एक धाव काढून बाद झाला. विजय शंकरदेखील १३ धावांत माघारी परतला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांच्यात ६५ धावांची भागीदारी झाली. हार्दिक चांगली सुरूवात मिळूनही ३१ धावांवर माघारी परतला. पण शुबमन गिलने शानदार अर्धशतक झळकावलं. तो शतकाच्या नजीक पोहोचत असतानाच झेलबाद झाला. त्याने ६ चौकार आणि ४ षटकार खेचत ४६ चेंडूत ८४ धावा केल्या.

शुबमन गिल बाद झाल्यावर राहुल तेवातिया आणि डेव्हिड मिलर जोडीने शेवटच्या काही षटकांच्या पुरेपूर आस्वाद घेतला. दोघांनीही मोक्याच्या क्षणी मोठे फटके खेळले. तेवातियाने ८ चेंडूत १४ धावा केल्या. तर मिलरने नाबाद २० धावा केल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२शुभमन गिलहार्दिक पांड्यागुजरात टायटन्सरिषभ पंत
Open in App