Join us

Hardik Pandya Mystery Girl, IPL 2022 GT vs DC Live: IPL 2022: हार्दिक पांड्यासाठी 'तो' होता खास क्षण; तितक्यात तरूणीवर कॅमेरा गेला अन्...

हार्दिकच्या संघाने पहिल्या सामन्यात मिळवला होता विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 22:32 IST

Open in App

Hardik Pandya Mystery Girl, IPL 2022 GT vs DC Live: IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्ध गुजरात टायटन्सने २० षटकांत ६ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर शुबमन गिलची ८४ धावांची खेळी आणि हार्दिक पांड्याची छोटेखानी ३१ धावांची खेळी याच्या जोरावर गुजरात ही धावसंख्या उभारली. या सामन्यात हार्दिकच्या आयुष्यातील एक खास क्षण आला असतानाच मैदानात एक गोष्ट घडली.

हार्दिक पांड्याच्या संघाने दिल्ली संघाला १७२ धावांचे मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा पृथ्वी शॉ १० धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात हार्दिक स्वत: गोलंदाजीसाठी आला. हार्दिकची गोलंदाजी हा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. पण पहिल्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय चाहते खुश झाले. पण त्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही. या सामन्यात मात्र त्याला पहिल्याच षटकात विकेट मिळाली.

IPL मध्ये कर्णधार झाल्यापासून ही त्याची पहिलीच विकेट होती. त्यामुळे हा हार्दिकच्या आयुष्यातील खास क्षण होता. त्याचवेळी दिल्ली संघाची सपोर्टर असलेल्या एका तरूणीवर कॅमेरा आला. ती दिल्लीला सपोर्ट करत असल्याने काहीशी नाराज झालेली पाहायला मिळाली. आपल्या कॅमेरा आलाय याचं भानंही तिला राहिलं नाही इतकी ती नाराज झाली. तिच्या मैत्रिणीनेही तिला सांगायचा प्रयत्न केला पण दिल्लीची खराब सुरूवात पाहून ती फारच नाराज झाल्याचं दिसून आलं. पाहा व्हिडीओ-

घडलेल्या प्रकारानंतर हार्दिकवर पुन्हा कॅमेरा मारण्यात आला, त्यावेळी हार्दिकचं लक्ष जवळ उभ्या असलेल्या सहकाऱ्यांकडे नसल्याचं दिसलं. पण तो लांबवर नजर मारून नक्की कुठे पाहत होता, ते समजू शकलं नाही.

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यागुजरात टायटन्सशुभमन गिल
Open in App