हार्दिक पांड्याचा स्टायलिश अंदाज; हातातील घड्याळाची किंमत ऐकून भुवया उंचावतील!

हार्दिक पांड्यानं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केलाय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:02 IST2024-08-27T14:56:22+5:302024-08-27T15:02:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya Pandya’s luxury watch made headlines you will be shocked to hear its price | हार्दिक पांड्याचा स्टायलिश अंदाज; हातातील घड्याळाची किंमत ऐकून भुवया उंचावतील!

हार्दिक पांड्याचा स्टायलिश अंदाज; हातातील घड्याळाची किंमत ऐकून भुवया उंचावतील!

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. मोठ्या ब्रेकमध्ये अगदी निवांत वेळ घालवणाऱ्या हार्दिक पांड्यानं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केलाय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

महागड्या वस्तूंचा शौकीन आहे पांड्या


हार्दिक पांड्याच्या स्टायलिश अंदाजाशिवाय त्याने घातलेले घड्याल लक्षवेधी ठरताना दिते. या फोटोत हार्दिक पांड्याच्या हातात एक  महागडे घड्याळ दिसते. या घड्याळ्याची किंमत अनेकांना थक्क करून सोडणारी आहे. ऐकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढणारा पांड्याला क्रिकेटनं खूप काही दिलं आहे. सध्याच्या घडीला तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अलिशान घर, कार आणि प्रायव्हेट जेट यो गोष्टींमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. त्याच्याकडील महागड्या वस्तूंमध्ये घड्याळालाही एक वेगळे स्थान आहे. तेच या फोटोतून दिसून येते.    

त्याच्या हातातील घड्याळाची किंमत ऐकून व्हाल थक्क

Hardik Pandya
Hardik Pandya

भारतीय ऑलराउंडरच्या हातात जे घड्याळ दिसते आहे ते महागडे म्हणजे लाख दोन लाखांच्या घरात नाही. तर या घड्याळाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. क्रिकेटरनं ज्या घड्याळाला पसंती दिलीये ते Patek Philippe Nautilus Platinum 5711 या ब्रँडचे आहे. ज्याची किंमत जवळपास ५ कोटी रुपयांच्या घरात आहे. जे हिऱ्यांनी सजले आहे. हार्दिक पांड्याच्या वॉच कलेक्शनमधील हे त्याचे सर्वात आवडते घड्याळ असल्याचे दिसते. कारण बऱ्याचदा तो हेच घड्याळ घालून मिरवताना दिसले आहे. 

नातं तुटलं, सर्वकाही विसरून हसत खेळत जगतोय हा क्रिकेटर
 


हार्दिक पांड्या आपलं दु:ख लपवून हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करत असल्याचा सीन या फोटोतून दिसून येतो. या आशयाच्या काही कमेंट्सही व्हायरल फोटोवर पाहायला मिळतात. टी-२० वर्ल्ड चॅम्पियन हार्दिक पांड्या हा नताशासोबतच्या नाते तुटल्यामुळे चर्चेत राहिला होता. जिच्यासोबत दोन वेळा लग्न केलं ती त्याला सोडून निघून गेली आहे. विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुलगा अगस्त्या याच्या संगोपनाची जबाबदारी एकत्रित घेऊ, असेही या जोडीनं म्हटले होते.  


 

Web Title: Hardik Pandya Pandya’s luxury watch made headlines you will be shocked to hear its price