Join us  

कपिल देव अन् इम्रान खान यांच्या आसपासही नाही Hardik Pandya; अब्दुल रझाकचं रोखठोक उत्तर

पैसा आल्यानंतर तुम्ही विश्रांतीचा अधिक विचार करायला लागता, अब्दुल रझाकची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:51 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज अब्दुल रझाकनं शुक्रवारी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावरून अजब दावा केला. भारत आणि पाकिस्तान यांचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव आणि इम्रान खान यांच्या तुलनेत पांड्या कुठेच नसल्याचा दावा रझाकनं केला. पण, त्याचवेळी पांड्याकडे गुणवत्ता आहे, परंतु त्याला मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असेही रझाकने सांगितले.

तो म्हणाला,''पांड्या चांगला खेळाडू आहे, परंतु तो चांगला अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. त्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही खेळाला पुरेसा वेळ देत नाही, तेव्हा तुमचे लक्ष विचलित होते. ''

पांड्याला गतवर्षी दुखापत झाली होती आणि ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता. मार्चमध्ये आयोजित दक्षिण आफ्रिका मालिकेतून तो टीम इंडियात पुनरागमन करणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे ती मालिका रद्द करण्यात आली.

''त्याला मानसिक आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी अथक प्रयत्न करावे लागतील. तुम्ही पाहत असालच, तो सातत्यानं दुखापतग्रस्त होतोय. जेव्हा तुम्ही खूप पैसा कमावता, तेव्हा तुम्ही विश्रांतीचा अधिक विचार करता. मोहम्मद आमीरनेही मेहनत घेतली नाही आणि त्यामुळे त्याची कामगिरी खराब होत गेली,'' असेही रझाक म्हणाला.

पांड्या आणि कपिल देव यांच्या तुलनेबाबतही 40 वर्षीय रझाकनं रोखठोक मत मांडलं. तो म्हणाला,''कपिल देव आणि इम्रान खान हे सर्वकालिन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. या पंक्तीत पांड्या कुठेही नाही. मीही अष्टपैलू खेळाडू होतो, परंतु याचा अर्थ असा नाही की मी स्वतःची तुलना इम्रान खान यांच्याशी करू. कपिल देव आणि इम्रान खान हे वेगळ्याच पंक्तीतले खेळाडू होते.''  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

Maharashtra day : 'तो' खास फोटो अन् सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

Sania Mirza ला मिळाली आनंदाची बातमी; म्हणाली, हा क्षण माझ्यासाठी खास! 

Bad News : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर क्रिकेटची मोठी लीग 2020मध्ये होणार नाही 

Breaking : ऑस्ट्रेलियन संघाकडून टीम इंडियाला मोठा धक्का

 आर अश्विननं सांगितली Positive News; ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल

WWE सुपरस्टार जॉन सीनानं Rishi Kapoor यांना वाहिली श्रद्धांजली; फोटो पाहून व्हाल भावुक 

कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धा नाही, तरीही टीम इंडियानं का गमावलं अव्वल स्थान?

 

टॅग्स :हार्दिक पांड्याकपिल देवइम्रान खान