Join us

हार्दिक पांड्या व लोकेश राहुल लवकरच छोट्या पडद्यावर!

भारतीय संघातील सलामीवर लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 16:13 IST

Open in App
ठळक मुद्देहार्दिक व लोकेश यांच छोट्या पडद्यावर पदार्पणक्रिकेटपलिकडे मारल्या मनमोकळ्या गप्पाबॉलिवूड अभिनेंत्रीसोबत असलेल्या मैत्रीवर चर्चा

मुंबई : भारतीय संघातील सलामीवर लोकेश राहुल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. लोकेश राहुल सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी संघासोबत आहे, तर इंग्लंड दौऱ्यात जायबंद झालेला पांड्या संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. पण, दिवाळीच्या निमित्ताने या दोघांनी एका 'टॉक शो' मध्ये सहभाग घेतला. त्यात त्यांनी क्रिकेटपलिकडच्या गप्पा मारल्या.

प्रसिद्ध निर्माता करण जोहर हा होस्ट करत असलेल्या 'कॉफी विथ करण' या बॉलिवूड सेलिब्रेटिंसाठी असलेल्या कार्यक्रमात राहुल व पांड्या यांना बोलावण्यात आले आहे. प्रथमच या कार्यक्रमात क्रिकेटपटूंना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांनी जोहरच्या प्रश्नांचा मारा कसा परतवला याची उत्सुकता लागली आहे. ''या दोघांनी क्रिकेट आणि त्याव्यतिरिक्त बऱ्याच गप्पा मारल्या,'' असे सूत्रांनी सांगितले. क्रिकेटपलीकडे या दोन्ही खेळाडूंचे बॉलिवूड कनेक्शनही आहे. पांड्या आणि अभिनेत्री इशा गुप्ता यांचे नाव अनेकदा चर्चिले गेले आहे. राहुलही अभिनेत्री निधी अगर्वाल सोबत अनेकदा फिरताना दिसला आहे. त्यामुळे या नात्याचा खुलासा हे दोघेही करतात का, जोहर त्यांना बोलतं करतो का, याची उत्सुकता आहे.

 

टॅग्स :हार्दिक पांड्याकरण जोहरकॉफी विथ करण 6