Join us

सारा तेंडुलकरनं 'त्या' फोटोवर केली कमेंट; हार्दिक पंड्याकडून ट्रोल झाला युवा खेळाडू 

भारतीय संघातील सर्वात मस्तीखोर, सहकाऱ्यांचे पाय खेचण्याची एकही संधी न दवडणारा हार्दिक पांड्याला फिरकी घेण्यासाठी नवा खेळाडू सापडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 15:37 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघातील सर्वात मस्तीखोर, सहकाऱ्यांचे पाय खेचण्याची एकही संधी न दवडणारा हार्दिक पांड्याला फिरकी घेण्यासाठी नवा खेळाडू सापडला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरची कन्या सारानं इंस्टाग्रामवर शुबमन गिलच्या एका फोटोवर कमेंट केली आणि त्यानंतर पांड्यानं गिलची चांगलीच फिरकी घेतली.  

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या गिलनं त्याच्या नव्या कोऱ्या गाडीसह फोटो इंस्टावर पोस्ट केला. त्यानंतर त्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. त्यात साराचाही समावेश होता. गिलनं मैदानावरील कामगिरीनं सर्वांना आकर्षित केले होतेच. त्यानं आयपीएलमध्ये 14 सामन्यांत 296 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता तो सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे.  गिलच्या या फोटोवर सारानं कमेंट केली आणि पांड्यानं लगेच गिलची फिरकी घेतली.

टॅग्स :हार्दिक पांड्याशुभमन गिलसारा तेंडुलकर